नागपूर :नागपूर आता शैक्षणिक हब बनत ( Nagpur is Becoming Educational Hub ) आहे. आता नागपुरात आयआयएम, आयटी, आणि लॉ युनिव्हर्सिटी सुरू ( Maharashtra Law University in Nagpur ) होत आहे. यात मला विश्वास आहे, येत्या काळात जगात कायदे विधिज्ञ क्षेत्रात मोठ्या उच्चस्तरावर नेण्यासाठी आणि गुणवत्ता पूर्ण बनवण्यासाठी मैलाचा दगड ठरेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ( Union Minister Nitin Gadkari ) यांनी बोलून दाखवला. ते नागपुरात महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या वसतिगृह ( Inauguration of Maharashtra National Law University Hostel ) आणि सुविधा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.
न्यायपालिकेवर विश्वास ठेवला पाहिजे : न्यायपालिकेच्या निर्णयांवर विश्वास ठेवला पाहिजे, आणि त्यात कोणीही हस्तक्षेप करू नये. मात्र, न्याय लवकर मिळाले पाहिजे, हे ही तेवढेच आवश्यक आहे. तसेच, निर्णय देणे हा न्यायपालिकेचा अधिकार त्यात कोणाचा हस्तक्षेप असू नये. मी काही कंपन्या उशिरा न्याय मिळाल्यामुळे बुडताना पाहिल्या आहे. त्यामुळे कुठलीही गोष्ट ही योग्य वेळेतच मिळाली पाहिजे, असेही केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले आहेत.
सरकारी अनुदानावर अवलंबून न राहता विस्तार करावा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठासाठी निधी कमी पडू देणार नाही, असे आश्वासन दिले आहे. पण, सुरुवातीला तुम्ही बँकेतून 50 कोटीचे कर्ज घेऊन विद्यापीठ उभारले आहे. या कर्जाचा काही भाग तुम्ही फेडलाही आहे. त्यामुळे भविष्यात लॉ युनिव्हर्सिटीने आणखी कर्ज घेऊन विस्तार करण्याचा विचार ठेवावा. कारण फक्त सरकारी अनुदानावर शैक्षणिक संस्थेने अवलंबित राहू नये, असेही ते म्हणालेत. निश्चित निधी कमी पडणार नाही. पण केवळ सरकारच्या मदतीची अपेक्षेपेक्षा ज्यांना गरीब गरजूंना गरज आहे त्यांना मोफत द्या पण जे देऊ शकतात त्याच्याकडून घ्या असाही सल्ला त्यांनी उदघाटन प्रसंगीं बोलतांना दिला आहे.
विदर्भात उच्च दर्जाचे मन्युष्यबळ निर्माण होत आहे :नागपूरकर म्हणून अभिमान आहे. महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाला निधी कमी पडणार नाही, असेही आश्वस्त केले. या विद्यापीठाच्या माध्यमातून येणाऱ्या पिढीसाठी हे बीज रोपन होत आहे. आमची इच्छा होती की नागपुरात विधी विद्यापीठ व्हावे. आज तो स्वप्न साकार होत आहे. नागपूर किंवा विदर्भात उच्च दर्जाचा मनुष्यबळ निर्माण होत नाही तोवर विकास होऊ शकत नाही. सामान्यतः जिथे आर्थिक विकास असते तिथे चांगला शिक्षण ही पाहायला मिळते, त्यामुळे लोकांना वाटते की तिथे आर्थिक विकास आहे, म्हणून चांगले शिक्षण आहे. मात्र, प्रत्यक्षात सत्य यापेक्षा विपरीत असते. जिथे चांगला शिक्षण असते, तिथे आर्थिक विकास होते. चांगला शिक्षण, दर्जेदार मनुष्य बळ हे विकासासाठी चुंबकाचे काम करते असेही फडणवीस म्हणालेत.