महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

IIM Nagpur : राष्ट्रपतींच्या हस्ते Nagpur IIMच्या इमारतीचे उद्घाटन, नितीन गडकरींसह अनेकांची उपस्थिती - नागपूर आयआयएम

आयआयएम नागपूर ( Indian institute of Management Nagpur ) हे केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन बदल घडवणारी संस्था आहे. तसेच हे रोजगार देणारे केंद्र बनेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind Inaugurate IIM Nagour ) यांनी व्यक्त केला आहे.

भव्य इमारतीचे उद्घाटन
भव्य इमारतीचे उद्घाटन

By

Published : May 8, 2022, 11:27 AM IST

Updated : May 8, 2022, 7:13 PM IST

नागपूर- आयआयएम नागपूर ( Indian institute of Management Nagpur ) हे केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर विद्यार्थ्यांच्या जीवनात नवीन बदल घडवणारी संस्था आहे. तसेच हे रोजगार देणारे केंद्र बनेल, असा विश्वास देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद ( President Ramnath Kovind Inaugurate IIM Nagour ) यांनी व्यक्त केला आहे. ते नागपूर येथील आयएमच्या भव्य कॅम्पस उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई, पालकमंत्री डॉ. नितीन राऊत, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, खासदार डॉ. विकास महात्मे, कृपाल तुमाने यांच्यासह नागपूर आयआयएमच्या संचलन मंडळाचे अध्यक्ष सी. पी. गुरनानी आणि संस्थेचे संचालक डॉ. भिमराय मैत्री यावेळी उपस्थित होते.

काय म्हणाले राष्ट्रपती -शैक्षणिक संस्था हे केवळ शिक्षणाचे स्थान नव्हे तर आपल्यातल्या सुप्त कलागुणांना नवी झळाळी देणारे ठिकाण असल्याचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी म्हटले आहे. स्टार्टअप आणि उद्योजकता यांना इनोव्हेशन आणि उद्योजतेला प्रोत्साहन देणाऱ्या जगात आपण जगत आहोत. नाविण्यपूर्ण संशोधन आणि उद्योजकता आपले जीवन अधिक सुकर करण्याची क्षमता आहे. त्याचबरोबर अनेकांना रोजगाराच्या संधी पुरवण्याचेही सामर्थ्य आहे. आयआयएम नागपूरची परिसंस्था, रोजगार मागणारे ऐवजी रोजगार पुरवणारे होण्याची मानसिकता विद्यार्थ्यांमध्ये रुजावी, यासाठी प्रोत्साहन देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशात सुरू असलेले स्टार्टअप हे येणाऱ्या काळात मोठा बदल (गेम चेंजर) घडवणारे ठरणार आहेत. उद्योग क्षेत्रात नव नवीन सेक्टर पाहायला मिळत आहे. फूड डीलीव्हरी, अप्लिकेशन बेस स्टार्टअप हे पाहिजे त्या प्रमाणात अजून विस्तारले नाही. त्यामुळे या ठिकाणी भरपूर संधी उपलब्ध होणार आहे. यात रोजगार उपलब्ध होणारी स्थळ ठरणार आहे. तसेच मोठ्या प्रमाणात महसूलसाठी विकसनशील ठरेल. या संस्थेतील विद्यार्थी पुढे जाऊन ग्लोब डॉटर बनणार आहे. जगभरात ते जाणार आहे. आज आपण एकमेकांशी जुळले आहे. पण इतरत्र जाताना आपली संस्कृती आहे, त्याचा विसर पडणार नाही, याची काळजी घेण्याचेही आवाहन विद्यार्थ्यांना केले आहे. भारतीय संस्कृतीचे दूत बनून सुद्धा जगभरात काम करावे, असेही ते म्हणाले.

आयआयएम नागपूरने, आपल्या उद्योजकता केंद्राद्वारे आयआयएम नागपूर फौंडेशन फॉर इंट्राप्रेनरशिप डेव्हलपमेंट (InFED) उभारल्याबद्दल इनफेडने महिला स्टार्ट अप कार्यक्रमातून महिला उद्योजकांना यशस्वी पदवीधारक होण्यासाठी सक्षम कारण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. त्यामुळे मुलाना या संधीमुळे निश्चितच अभिमानास्पद आहे. त्यापैकी सहा जणींनी उद्योगाचा प्रारंभ केल्याचे राष्ट्रपती म्हणाले. असे कार्यक्रम, महिला सबलीकरणासाठी प्रभावी उपलब्ध करून देत असल्याने खऱ्या अर्थाने शिक्षण क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्या सावित्रीबाई फुले, आणि आनंदी जोशी यांना श्रद्धांजली ठरेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

'एज्युकेशन हब निर्माण होत आहे' -आयएएमच्या माध्यमातून एक जागतिक दर्जाची वास्तू शहरात निर्माण झाली असून नागपूर हे एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असल्याचा अभिमानास्पद उल्लेख नितीन गडकरी यांनी केला. मेडिकल तसेच लॉजिस्टिक म्हणूनही नागपूर विकसित होत आहे. विदर्भातील समृद्ध वने व खनिजसंपदा यावर आधारित उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी आहे. उद्योगांच्या विकासासाठी या संस्थेने संयुक्तपणे उपक्रम राबविल्यास या भागाचा विकास होणार आहे. व्यवस्थापन क्षेत्रातील सर्वोच्च संस्था म्हणून या संस्थेचा निश्चितच नावलौकिक वाढेल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे.

'सामान्य व्यवसायिकांसाठी मॉडले तयार करावे' -पाश्चिमात्यांच्या तुलनेत स्थानिक शिक्षणप्रणालीला महत्त्व देणारे गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीदिनी भारताच्या एका प्रमुख संस्थेच्या कॅम्पसचे लोकार्पण होत असल्याचा आनंद व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अपेक्षित असलेल्या ज्ञान, अर्थ आणि नितीला अनुसरून या संस्थेची वाटचाल करावी. तसेच या संस्थेने गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील शाळा, महाविद्यालये दत्तक घेऊन तेथील विकासाचे माध्यम व्हावे. नागपूरच्या सीताबर्डी परिसरात छोटे उद्योग आहे, ते सुद्धा नफा कमावतात. पण त्यांची कोणी जाहिरात करत नाही. त्यामुळे रस्त्यावरील व्यावसायिकांसाठी आयआयएमने पुढाकार घेऊन व्यवसाय सुलभतेचे मॉडेल तयार करावे, असे आवाहन केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी व्यक्त केला.

'शासन सर्वोत्तपरी मदत करण्यास तयार' -नागपूर आयआयएम संस्थेतून बुद्धिमान विद्यार्थी व साहसी उद्योजक निर्माण होतील, असा आत्मविश्वास व्यक्त करताना बाळासाहेब ठाकरे यांनी विदर्भाच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते. त्या दिशेने आज एक महत्वाचे पाऊल पडले आहेत. आयआयएमने संस्थेच्या अनेक आंतरराष्ट्रीय संस्थेशी भागीदारी केली आहे. विविध देशातील संस्था या संस्थेशी जोडल्या गेल्या आहेत. त्यामुळे तरुणांना आपला उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी प्रोत्साहन व प्रशिक्षण आणि नवीन संधी मिळत आहे. ही संस्था नागपूरसह राज्यासाठी महत्त्वपूर्ण असल्यामुळे या संस्थेच्या विकासासाठी राज्य शासनातर्फे संपूर्ण सहकार्य करण्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचे, सुभाष देसाई यांनी म्हटले.

'नागपुरात उभी राहिलेली वास्तू 'स्टेट ऑफ आर्ट दर्जाची' -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक दर्जाचे कौशल्ययुक्त मनुष्यबळ मिळावे, यासाठी व्यवस्थापन अभ्यासक्रमाचा विस्तार करण्याची सुरुवात केली आहे. कौशल्य युक्त मनुष्यबळ निर्माण करण्याची ही प्रक्रिया असून नागपुरात उभी राहिलेली वास्तू 'स्टेट ऑफ आर्ट दर्जाची ' असून नवीन भारताचे स्वप्न साकारणारी आहे. त्यामुळे या परिसरात जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण देणाऱ्या संस्था सुरु झाल्याने उद्योजकतेचा विकास होईल, असा विश्वास विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

आयआयएमचे वैशिष्ट्ये -नागपूरचे हे कॅम्पस 132 एकर परिसरमध्ये असून त्याच्या पहिल्या टप्प्यात 600 हून अधिक विद्यार्थ्यांसाठी डिझाइन केलेले आहे. सध्या याठिकाणी 20 हाय-टेक क्लासरूम आणि 24 ट्रेनिंग आणि सेमिनार रूम्ससह 400 सीटर कन्व्हेन्शन सेंटर आहेत. १३२ एकर भूमीवर आयआयएम नागपूरचे भव्यदिव्य कॅम्पस साकारण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यातील बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. मिहानमधील एम्स हॉस्पिटलच्या बाजूला आयआयएमची संपूर्ण उभारणी झाली आहे. सध्या ६६८ विद्यार्थ्यांना शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली आहे. पर्यावरणाच्यादृष्टीने इमारतीची उभारणी करण्यात आली असून मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड देखील करण्यात आली आहे. याठिकाणच्या वर्गखोल्या, त्यांची रचना, जागतिक स्तराच्या प्रशिक्षणाची यंत्रसामुग्रीने ह्या वर्ग खोल्या सज्ज आहेत. विद्यार्थ्यांसाठी असणाऱ्या अन्य सुविधा देखील दर्जेदार असून देशभरातील विद्यार्थ्यांची पसंती या संस्थेला मिळत आहे. २०१५ ला सुरु झालेल्या या संस्थेला नव्या कॅम्पसमुळे झळाळी आली आहे. जगभरातील आघाडीच्या संस्थांशी सहकार्य करार करण्यात आले असून विदेशातून ऑनलाईन मार्गदर्शनाची सोय याठिकाणी राहणार आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठी मेरिट स्कॉलरशिप आणि नीड कम मेरिट स्कॉलरशिप अशा दोन प्रकारे या योजनांचा लाभ आयआयएम विस्तार योजनेत आगामी काळात एकूण ७ सेंटर ऑफ एक्सलन्सची स्थापना करण्यात येणार आहे.

हेही वाचा -IIM Nagpur : आयआयएम नागपूरच्या कॅम्पसचे राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते उद्घाटन, जाणून घ्या खास आयआयएमबद्दलच्या गोष्टी

Last Updated : May 8, 2022, 7:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details