नागपूर -एक काळ होता, जेव्हा मुलींची घरात पूजा केली जात असे. मात्र, आता तसे होताना दिसत नाही. आता देशात मुली महिला सुरक्षित नाहीत, अशी खंत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूरच्या जमनालाल बजाज या प्रशासकीय भवनाचे उद्घाटन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते गुरुवारी झाले, त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा... आपल्यात आता कोणतेही नाते उरले नाही... नात्यांचे तसे ओझेच होते, तेही उतरले!
भगत सिंह कोश्यारी म्हणाले, की पूर्वी अनेक घरांमध्ये मुलींची पूजा केली जायची. मात्र हल्ली महिलांवरील अत्याचार-बलात्काराच्या घटना वाढत आहेत. महिलांना धमक्या देऊन त्यांच्यावर अत्याचार केले जातात. त्यामुळे या सर्वांपासून स्वत:चे संरक्षण करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी संस्कृत श्लोक शिकायला हवेत, त्या माध्यमातून अत्याचाराच्या घटना टाळता येतील, असे मत भगत सिंह कोश्यारी यांनी मांडले.