महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

छोटू भोयर यांनी सेवाग्रामच्या बैठकीतचा दिला होता काँग्रेस प्रवेशाचा होकार...!

रवींद्र भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून चार वेळेला ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. छोटू भोयर आणि त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून विचारधारेशी जुळून होते. पण त्यांनी आता काँग्रेसच्या विचाराधारेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे.

chotu bhoyar
chotu bhoyar

By

Published : Nov 22, 2021, 7:41 PM IST

नागपूर - कधीकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठांवंत राहिलेले भाजपचे नगरसेवक छोटू उर्फ रवींद्र भोयर यांनी रितरसर काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. देवडिया भवन येथे झालेल्या काँग्रेसच्या बैठकीत त्यांनी रीतसर काँग्रेसच्या सदस्य पदाचा अर्ज भरून पंजाचा हात धरला. आज जरी हा प्रवेश झाला असला यांच्या हालचाली कॉंग्रेसच्या वर्ध्याच्या सेवाग्राम आश्रमातील झालेल्या बैठकीतच छोटू भोयर यांच्या काँग्रेसच्या पक्षातील प्रवेशाला हिरवी झेंडा मिळाला होता.

छोटू भोयर यांनी सेवाग्रामच्या बैठकीत प्रवेशासाठी होकार


नगरसेवक रवींद्र उर्फ छोटू भोयर यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश
यात त्यांची दुसरी बैठक ही चंद्रशेखर बांवनकुळे यांचा नावाची घोषणा होताच त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा झाली आहे. त्यानंतर त्यांचा पक्ष सोडण्याचा निश्चयाला बळ मिळाले आहे. त्यांनी सोमवारी सायंकाळी भाजपच्या सदस्य पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. नुकत्याच काँग्रेसची जनजागरण अभियान सेवाग्राम मध्ये पार पडली. 15 नोव्हेंबरला काँग्रेस पक्षातील नेते आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये पक्षात घेण्यास सहमती झाली होती. त्यानंतर प्रत्यक्ष बैठकीत चर्चा झाली. अखेर नागपुरातील देवडिया भवनात शहर काँग्रेस पक्ष कार्यालयात रीतसर सदस्य पदाचा अर्ज भरून रवींद्र भोयर हे काँग्रेसवासी झालेत. यावेळी नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री व ऊर्जामंत्री नितीन राऊत पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार यांच्यासह नागपूर शहर काँग्रेस अध्यक्ष आमदार विकास ठाकरे आणि नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र मुळक हे ही उपस्थित आहे.

संघ सोडून काँग्रेसची विचारधारा स्वीकारली
रवींद्र भोयर हे भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक असून चार वेळेला ते नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. छोटू भोयर आणि त्यांचे कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी अनेक दशकांपासून विचारधारेशी जुळून होते. पण त्यांनी आता काँग्रेसच्या विचाराधारेवर चालण्याचा निर्णय घेतला आहे. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थेचे भाजपचे उमेदवार म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नामांकन अर्ज भरला आहे. पण त्यावेळी भाजप सोडून छोटू भोयर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे. काँग्रेस पक्षासाठी चांगले संकेत असून भाजपच्या पराभवाची नांदी आहे असेही पालकमंत्री नितीन राऊत यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

काँग्रेसचा उमेदवाराचा नावाचा निर्णय वरिष्ठ पातळीवर
कधी कधी आश्चर्य चकित करणाऱ्या घटना घडत असतात. यात काँग्रेस पक्ष जो उमेदवार देईल, तो उमेदवार विजयी होईल असा विश्वास आहे. उमेदवाराच्या नावाचा निर्णय पक्षाचा वरिष्ठ पातळीवर होऊन नावाची घोषणा होईल. आम्ही सगळे तो निर्णय मान्य करत, जो उमेदवार देईल त्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू, आमची तयारी पूर्ण झाल्याचेही पालकमंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.

छोटू भोयर यांना तिकीट मिळाल्यास पक्षात नाराजीचा सूर
यात भाजपमध्ये झालेला अपमानामुळे त्यांनी काँग्रेस प्रवेश झाला आहे. त्यांना काँग्रेसकडून उमेदवारी देणार अशीच शक्यता आहे. अद्याप अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा झालेली नाही. पण तसे होऊन त्यांना उमेदवारी जाहीर झाल्यास काँग्रेसचे ग्रामीणचे अध्यक्ष माजी मंत्री राजेंद्र मुळक नाराज होतील असेंही बोलले जात आहे. त्यामुळे अंतर्गत नाराजी आणि फोडा फोडीच्या राजकारणाला दोन्ही बाजूने सुरवात होईल.

छोटू भोयर कोण आहे
छोटू भोयर यांनी 1986 पासून भाजपा युवा मोर्च्याचे सदस्य त्यानंतर 1988 मध्ये अध्यक्ष झाले. त्यानंतर महामंत्री झाले. 1997 मध्ये ते नागपूर महापालिकेत पहिल्यांदा नगरसेवक म्हणून निवडून आलेत. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा रेशीमबाग कार्यालय असलेल्या भागातून ते नगरसेवक झाले हे विशेष. 2001 मध्ये ते उपमहापौर झाले. 2003 ते 2007 या काळात भाजपचे जिल्हा सचिव म्हणून पक्षाचे काम पाहिले. 2009 पासून 2013 पर्यंत सरचिटणीस राहिले आहे. 2012 मध्ये पुन्हा नगरसेवक, 2012 ते 2017 कालखंडात ते एनआयटीचे ट्रस्टी राहिले आहे. 2017 मध्ये पुन्हा नगरसेवक म्हणून चौथ्यांदा निवडणून आलेले आहे. आता त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आहे.

छोटू भोयरचे संघ परिवाराशी नाते
रवींद्र भोयर यांचे वडील प्रभाकर भोयर हे संघाचे प्रचारक राहिले असून त्यांनी निझामाच्या राज्यात प्रचारक म्हणून काम केले. रवींद्र भोयर यांच्या आई ताराबाई भोयर याही सुरुवातीपासूनच संघाशी जोडून काम केले आहे. भाजप पक्ष होण्यापूर्वी जनसंघ असताना ताराबाई यांनी काम केले. त्यानंतर भाजपची निर्मिती झाल्यावर त्या संघाचे कार्यालय असलेल्या रेशिमबाग भागातून नगरसेविका ही राहिल्या आहे. त्याचा भागातून छोटू भोयर हे सुद्धा नगरसेवक म्हणून निवडणून आले आहेत. रवींद्र भोयर यांचे मामा डॉ विलास डांगरे हे नागपुराूचे सुप्रसिद्ध होमिओपॅथीक डॉक्टर आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत स्वयंसेवक म्हणून आजही कार्यरत आहेत.
हेही वाचा -Covid Vaccination : लहान मुलांना लस व ज्येष्ठांना बूस्टर डोससाठी केंद्राकडे मागणी - राजेश टोपे

ABOUT THE AUTHOR

...view details