महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर मनपाची अभय योजना कार्यान्वित; थकीत संपत्ती करावरील शास्ती केली जाणार माफ - Nagpur latest news

दर वर्षी थकीत संपत्ती कराचा आकडा हा वाढतच जात असल्याने याचा थेट परिणाम हा शहरातील विकासकामांवर होतो आहे. हे वर्ष संपत असताना नागपूर महानगरपालिकेने थकीत संपत्ती कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे.

Nagpur
Nagpur

By

Published : Dec 15, 2020, 5:12 PM IST

Updated : Dec 15, 2020, 5:58 PM IST

नागपूर - महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून संपत्ती कर बुडवणाऱ्या लोकांची यादी फुगतच असल्याने मनपाने ही योजना सुरू केली असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष विजय (पिंटू) झलके यांनी दिली आहे. या योजनेच्या माध्यमातून मनपाला थकीत सहाशे कोटी रुपयांपैकी ८० टक्के कर वसूल होण्याची आशा आहे.

आर्थिक कोंडीत सापडली महापालिका

उपराजधानी नागपूरच्या विकासाला चालना देणारी नागपूर महानगरपालिका सध्या संपत्ती कर बुडवणाऱ्या नागरिकांमुळे आर्थिक कोंडीत सापडली आहे. दर वर्षी थकीत संपत्ती कराचा आकडा हा वाढतच जात असल्याने याचा थेट परिणाम हा शहरातील विकासकामांवर होतो आहे. हे वर्ष संपत असताना नागपूर महानगरपालिकेने थकीत संपत्ती कर वसूल करण्यासाठी अभय योजना सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेणाऱ्या ‘थकीत मालमत्ता करावरील दंड माफ’ केला जाणार आहे. त्यामुळे साडेसहा लाख थकबाकीदारांना मिळणार दिलासा मिळणार आहे. ३१ मार्च २०२०पर्यंत मालमत्ता कर थकीत असलेल्यांना या योजनेचा फायदा होणार आहे. या अभय योजनेतून मनपा थकबाकीदारांना १५७ कोटी रुपये दंड माफ केला जाणार आहे. यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणात थकबाकीदारांना याचा फायदा होणार आहे. आधीच आर्थिक संकटात असलेली नागपूर मानपाच्या उत्पन्नावर कोरोनामुळे परिणाम झाला आहे. नागरिकांची आर्थिक परिस्थिती बिकट झाल्यामुळे अनेकांनी मालमत्ता कर भरला नाही. सध्या मनपाचे ८१० कोटी रुपये मालमत्ता कर थकित आहेत. त्यापैकी २५० कोटी कर हा चालू आर्थिक वर्षातील आहे तर ६०० कोटी कर हा थकीत आहे.

अपील मागे घेतल्यास यांनाही मिळणार लाभ

अनेक वेळा संपत्ती कर भरणारा करदाता हा मनपाच्या विरोधात अपील मध्ये जाऊन न्यायालयात दाद मागतो.त्यामुळे अनेक वर्ष हे खटले प्रलंबित राहतात.त्यामुळे त्यांचा कर हा वाढतच जात असतो. अश्या लोकांनी आपले अपील मागे घेतल्यास त्यांना देखील या अभय योजनेचा लाभ देणार असल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली आहे.

नियमित कर भरणा करणाऱ्यांना मिळणार सवलत

नागपूर शहरातील साडे सहा लाख कर दात्यांपैकी लाखो करदाते हे नियमित स्वरूपात कर भरणा करत असतात,मात्र ज्यावेळी अभय योजनेच्या माध्यमातून कर बुडावणार्या लोकांना फायदा होते, त्यावेळी नियमित कर भरणा करणाऱ्या लोकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. अश्या लोकांना मनपाने ४ टक्के सूट देणार असल्याचं जाहीर केलं आहे

Last Updated : Dec 15, 2020, 5:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details