नागपूर - समाजात अशांतता आणि बेजबाबदार वक्तव्य करणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर कारवाई करण्याची मागणीचे पत्र भाजपचे महासचिव चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसच्या सर्वेसर्वां सोनिया गांधींना लिहले ( Chandrashekhar Bawankule Letter Soniya Gandhi ) आहे. मागील काही दिवसांपासून नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान यांच्यावर ( Nana Patole On Pm Modi ) वक्तव्य केल्याचा वाद पेटला असताना राष्ट्रपिता महात्मा गांधी ( Nana Patole On Mahatma Gandhi ) यांच्या पुण्यतिथी कार्यक्रमात 'वध' असा उल्लेख केल्याने नवीन वादाला तोंड फुटले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रात म्हटले की, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष नाना पटोले ( Congress President Nana Patole ) हे सातत्याने समाजविघातक वक्तव्य करून सामाजिक शांतता बिघडवित आहेत. काँग्रेस पक्षासोबत राजकीय आणि वैचारिक मतभेद असले तरी राष्ट्राचे हित जिथे असते, तिथे सर्व प्रकारचे मतभेद विसरून एकत्र यावे. हा आपल्या समृध्द लोकशाहीचा संस्कार आहे. त्याच भावनेतून पत्र लिहत असल्याचे बावनकुळे यांनी पत्रात नमूद केले आहे.
चंद्रशेखर बावनकुळेंचे सोनिया गांधींना पत्र राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचा 'वध' असा उल्लेख केला. 'वध' हा राक्षसांचा होत असतो, महापुरुषांचा नाही, ही सामान्य गोष्ट या जबाबदार व्यक्तीला समजत नाही का, असाही प्रश्न उपस्थित होत आहे. काँग्रेस पक्ष हा देशातील जुना पक्ष आहे. या पक्षाचेच प्रदेशाध्यक्ष राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा 'वध' झाला असा शब्द प्रयोग करत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जाहीर अपमान करत आहे. काँग्रेस पक्ष प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची ही विकृती खपवून घेतो, ही बाब सर्वांनाच खटकणारी आहे. नाना पटोले हे अशा विकृतीच्या माध्यमातून समाजात अशांतता निर्माण करीत आहेत. अशा बेजबाबदार व्यक्तीवर आपण कठोर कारवाई करावी आणि त्यांना पदावरून तातडीने बरखास्त करावे, अशी विनंती चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पत्राच्या माध्यमातून काँग्रेसच्या सर्वेसर्वां सोनिया गांधी यांना केली आहे.
हेही वाचा -Parambir Singh Recovery Case : परमबीर सिंहाच्या अडचणीत वाढ, सॉफ्टवेअरद्वारे छोटा शकीलचा आवाज काढून मागितली खंडणी