नागपूर- दैनंदिन जीवनात भरमसाठ ऊर्जेच्या वापरामुळे क्लायमेटचेंजचे गंभीर परिणाम रोखण्यासाठी एका प्राध्यापकाने 'एनर्जी स्वराज यात्रा' सुरू केली आहे. मुंबई आयआयटीचे प्राध्यापक असलेले चेतनसिंह सोलंकी असे या प्राध्यापकाचे नाव आहे. देशभरात फिरून 2 लाख किलोमीटरच्या यात्रा करणार आहे. 2020 ते 2030 दरम्यान 11 वर्षात 100 कोटी लोकांमध्ये जनजगृती करण्यासाठी घर दार त्यागून यात्रेला सुरवात केली आहे. पारंपरिक ऊर्जा असो की नैसर्गिक ऊर्जा याचा वापर सीमित करून पृथ्वीवरील हवामान बदलाचा संकटाला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज असल्याचा संदेश देत ते निघाले आहे. जाणून घेऊ त्यांच्या एनर्जी स्वराज यात्रेबद्दल या खास रिपोर्टमधून...
आयआयटी मुंबई प्राध्यापकाची 'एनर्जी स्वराज यात्रा' चेतनसिंह सोलंकी हे मुंबई आयआयटीमध्ये प्राध्यापक असून मागील अनेक वर्षांपासून सौर ऊर्जेवर काम करत आहे. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना 'सोलर मॅन ऑफ इंडिया' हा किताब एका संस्थेकडून बहाल करण्यात आला आहे. माहात्मा गांधीजीनी स्वतःचा गरजा सीमित ठेवत स्वावलंबनाचा संदेश दिला होता. यालाच धागा मानून जल आणि वायू प्रदूषण कमी करून ग्लोबल वार्मिंगला रोखण्यासाठी उर्जेचा उपयोग कमी करू गांधीजींच्या स्वलांबनचा नारा देत आहे. स्वतःच्या गरजा सीमित करून सौर ऊर्जेचा उपयोग करण्याचे आवाहन ते यात्रेच्या माध्यमातून करत आहे. गावपातळीवर स्वलांबन आणि आत्मनिर्भर होण्याची गरज असल्याचे महत्व पटवून देण्यासाठी प्राध्यापक चेतनसिंह सोलंकी भारत भ्रमंतीवर निघाले आहे.
गांधीजींचा स्वलांबनाचा नारा -
गांधींच्या विचारांना एनर्जी मानून एनर्जी स्वराज यात्रा सुरुवात केल्याचे प्रा. सोलंकी सांगतात. ऊर्जेचा बेहिशोबी वापराने जल आणि वायू झालेल्या बदलामुळे अनेक देश नैसर्गिक आपत्तीना समोर जात आहे. ही समस्या केवळ भारतापुढे नसून जगभरात नैसर्गिक प्रलयाच्या माध्यमातून गंभीर रूप पाहायला मिळत आहे. त्यामुळे सगळ्यांनीच एनर्जी स्वराजच्या माध्यमातून उर्जेचा इतर स्त्रोतांचा वापर कमी करून सौर ऊर्जेचा वापर वाढवण्याचा पण तोही सीमित वापर करण्याचा संदेश देत आहे.
2 लाख किलोमीटरची यात्रा देशभरात खेड्यापाड्यात जाणार -
2020 मध्ये सुरू भोपळा येथून मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चौहान यांच्या उपस्थितीत ही यात्रा सुरू झाली होती. पण कोरोना काळात काही प्रमाणात यात्रा हळू झाली. दरम्यान दोन वर्षात 14 हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे. यात आता पुन्हा गतिमान होत गाव असो की शहर सर्वच भागात यात्रा जात आहे. प्रत्येक जण ऊर्जेचा वापर करत असून प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष 100 कोटी लोकांना भेटून ऊर्जा साक्षर करण्याच्या संकल्प घेतला आहे. ऊर्जा साक्षर होताना पेट्रोल डिझेल इंधन, कोळशाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या ऊर्जेचा वापर कमी करण्यावर भर देण्याचे काम एनर्जी स्वराज यात्रेच्या माध्यमातून सुरू आहे. घरातील फ्रीज, एसी, गिझर, पंखे हे उपकरण जरी वापरतांना विद्युत ऐवजी सोलरवर वापरले तरी मोठी मदत या मोहिमेत आपण करू शकतो हे समजावून सांगण्याचे काम केले जात आहे.
घरदार सोडून 11 वर्ष बसमध्येचा असणार मुक्काम -
प्राध्यापक चेतनसिंह सोलंकी संकल्प घेऊन अकरा वर्ष स्वतःचे घरदार सोडून उच्च गलेलठ्ठ पगारापासून सुट्टी घेत भारत भ्रमंतीवर निघाले आहे. यासाठी 11 वर्ष घरापासून दूर रहाताना चेतनसिह सोलंकी यांनी एका बसलाच स्वतःचे घर बनवत दोन लाख किलोमीटरचा लांब प्रवास सुरू केला आहे. ही बस जरी डीझेलवर धावत असली तरी दैनदिन पंखे, चार्जिंगची सोय, अन्न शिजवण्यासाठीचे उपकरणे असो, पंखा, एसी, टीव्ही, लॅपटॉप, फोन या सगळ्यांच्या उपयोग करताना सोलरच्या साह्याने चालतील अशी खास व्यवस्था बसमध्ये करून घेत सौर ऊर्जा वापरण्याचा संदेश देत आहे. पाच जणांची चमू घेत दिवसभर जनजागृती ससंध्याकाली जेवण आणि याच बसमध्ये विश्रांती घेत पुढे जात आहे. पण इतरांना सोलर वापारा हा संदेश देण्यापूर्वी स्वतःपासूनच त्याची सुरुवात करण्याचा म्हणजेच स्वालंबनाचा हा भाग असल्याचेही प्राध्यापक चेतनसिंह सोलंकी सांगतात. हवामानबदलाच्या परिणामांना जागतिक स्तरावर सगळे देश समोर जात आहे. पण या परिस्थितीत मोठमोठ्या बाता न करता जल आणि वायू प्रदूषण कमी करण्यासाठी स्वतः त्याचा अवलंब करून लोकांसमोर उदाहरण ठेवण्याचे काम आयआयटीचे प्राध्यापक चेतनसिह सोलंकी करत आहे. गांधीजींचा स्वालंबनाचा नारा देत भ्रमंतीवर निघालेले सोलर गांधी उर्फ चेतनसिंह सोलंकी यांच्या कार्याला 'ईटीव्ही भारत'चा सलाम.