नागपूर -संविधान पठणामुळे विधिमंडळात नवीन शिस्त लागेल. तसेच जे नेते अधिवेशनातील कामकाज चालु असताना अनावश्यकरित्या गोंधळ घालतील, त्यांच्यावर संविधानात्मक पद्धतीने कारवाई होईल, असे सुतोवाच विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले आहे.
हेही वाचा... #CAA : दिल्लीमधील आंदोलक विद्यार्थ्यांची सुटका; जामिया विद्यापीठ पाच जानेवारी पर्यंत राहणार बंद!
नागपूरच्या पंजाबराव कृषी विद्यपीठा तर्फे 'अॅग्रोव्हेट अॅग्रोव्हिजन' या कार्यक्रमात ते उपस्थित होते. यावेळी नाना पटोले यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. संविधान पठणामुळे विधिमंडळात नवीन प्रथा सुरू होईल. नेत्यांना शिस्त लागेल. विधीमंडळ सभागृह हे कामकाजासाठी आहे, जे सदस्य गोंधळ करतील त्यांना नियमाप्रमाणे शिस्तीत आणू अशी माहितीही पटोले यांनी यावेळी दिली.