महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Devendra Fadnavis welcome Nagpur : महाराष्ट्रात आज जर निवडणुका घेतल्या तर, भाजपच जिंकेल - देवेंद्र फडणवीस - देवेंद्र फडणवीस स्वागत नागपूर

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली असून, आज जर निवडणुका घेतल्या तर त्यात भारतीय जनता पक्ष विजयी होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis grand welcome Nagpur ) यांनी व्यक्त केला.

devendra fadnavis welcome nagpur etv bharat
देवेंद्र फडणवीस स्वागत नागपूर

By

Published : Mar 17, 2022, 11:59 AM IST

नागपूर - नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने चार राज्यांत सत्ता मिळवली आहे. त्यामुळे, महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने वातावरण निर्मिती झाली असून, आज जर निवडणुका घेतल्या तर त्यात भारतीय जनता पक्ष विजयी होईल, असा विश्वास देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis grand welcome Nagpur ) यांनी व्यक्त केला. 2024 मध्ये महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने भाजप सरकार येईल, असे देखील ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी बातचित करताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी

हेही वाचा -Bhima Koregaon Case : सुरेंद्र गडलिंग यांना कारागृहामध्ये लॅपटॉप वापरता येणार; सत्र न्यायालयाची परवानगी

नुकत्याच झालेल्या गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालात भारतीय जनता पक्षाने पहिल्यांदाच बहुमतापर्यंत मजल मारली आहे. जवळजवळ एकहाती सत्ता भाजपने मिळवलेली आहे. सत्ता विरोधी लहर असताना देखील भाजपला अनपेक्षित यश गोव्यात मिळाले आहे. या विजयाचे शिल्पकार राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आज त्यांचे पहिल्यांदाच नागपूर येथे आगमन झाले. या पार्श्‍वभूमीवर शहर भाजपकडून त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. त्याआधी हजारो भाजप कार्यकर्त्यांनी विमानतळावर मोठी गर्दी केली होती.

नागपूरकरांच्या प्रेमाचा सदैव ऋणी-

आज नागपूरकरांनी माझ्यावर जे प्रेम दाखवले, सत्कार केला, त्याचा मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि टीम गोवाच्या वतीने स्वीकार करतो, असे ते फडणवीस म्हणाले.

योग्य वेळी योग्य प्रकरण बाहेर काढू-

रोज नवनवीन घोटाळे आणि गैरव्यवहाराचे प्रकरण समोर येत असल्याने सरकार कोंडीत सापडले आहे. माझ्याकडे आणखी खूप पुरावे आहेत. योग्य वेळी ते बाहेर काढले जातील, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

हेही वाचा -१२ ते १४ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला अल्प प्रतिसाद, १२४ मुलांचे लसीकरण

ABOUT THE AUTHOR

...view details