महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा यांची नियुक्ती - विभागीय आयुक्तपदी प्राजक्ता वर्मा

प्राजक्ता वर्मा या भारतीय प्रशासन सेवेतील 2001 च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असून त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी पदापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली. सध्या त्या मराठी भाषा विभागामध्ये सचिव पदावर कार्यरत होत्या.

प्राजक्ता वर्मा
प्राजक्ता वर्मा

By

Published : Jun 24, 2021, 8:10 PM IST

नागपूर -मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता वर्मा यांची नागपूरच्या विभागीय आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्राजक्ता वर्मा या भारतीय प्रशासन सेवेतील 2001च्या तुकडीच्या सनदी अधिकारी असून त्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी पदापासून त्यांच्या कारकीर्दीची सुरूवात केली. सध्या त्या मराठी भाषा विभागामध्ये सचिव पदावर कार्यरत होत्या.

'या' जिल्ह्यामध्ये भूषविले 'ही' पदे

यापूर्वी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळे जिल्हाधिकारी, माहिती व जनसंपर्क महासंचालक, सह विक्रीकर आयुक्त, मुख्य सचिव कार्यालयात सहसचिव, राज्य उत्पादन शुल्क आयुक्त, सिडकोच्या सह व्यवस्थापकीय संचालक अशा विविध पदांवर काम केले आहे. सिडको येथे सह व्यवस्थापकीय संचालक पदावर कार्यरत असताना त्यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी दहा गावांचे गावठाणासहित पुनर्वसन करण्याची जबाबदारी पार पाडली. त्या धुळे जिल्हाधिकारी होत्या. तसेच अहमदनगर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असताना संत गाडगेबाबा अभियान, हागणदरीमुक्त अभियानात 163 गावांना लोकसहभागातून केंद्र शासनाच्या निर्मल ग्राम पुरस्कार मिळाला आहे.

वैजापूर येथून कामाला सुरुवात -

औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर येथे प्रांताधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर महात्मा फुले जलसंधारण अभियानात लोकसहभागातून वैजापूर पंचायत समितीला प्रथम क्रमांकाचे (17 लाख रुपयांचे) बक्षीस मिळाले. वर्मा यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या महासंचालक म्हणून जून 2009 ते मे 2011 दरम्यान काम पाहिले असून या विभागाला अधिक तंत्रस्नेही बनविण्यासाठी त्यांनी विविध उपक्रम राबविले होते.

हेही वाचा -विठ्ठल कोणाला पावणार? अध्यक्षपदासाठी काँग्रेसमधून 'या' नेत्यांच्या नावांची चर्चा

ABOUT THE AUTHOR

...view details