महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मातोश्रीवरुन मला 25 वेळा फोन आला होता, विजय वडेट्टीवारांचा गौप्यस्फोट - nagpur

पाच वर्ष यांच्याकडे सत्ता होती. या वर्षात कामे केली असती तर सरकारला यात्रा काढण्याची गरजच पडली नसती. यात्रेच्या माध्यमातून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

विजय वडेट्टीवार

By

Published : Aug 2, 2019, 12:29 PM IST

नागपूर - पक्षांतर करण्यासाठी मातोश्रीवरुन शिवेसना नेते मिलिंद नार्वेकर यांनी मला किमान 25 वेळा फोन केला होता. आमच्या पक्षात या, मंत्रिपद देऊ, असे प्रलोभन मला दिले होते, असा गौप्यस्फोट विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूर येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी वडेट्टीवार यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला.

भाजप हा हेडगेवारांच्या विचारावर चालणार पक्ष असल्यानेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सेवाग्राम आश्रमाकडे पाठ फिरवली. महात्मा गांधींचा आशीर्वाद मिळणार नसल्याने सेवाग्राम आश्रमात मुख्यमंत्री गेले नाहीत, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.

सरकार सर्व आघाडीवर अपयशी ठरले आहे. पीकविम्याचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाहीत. तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी झालेली नाही. बेरोजगारी वाढली आहे. राज्यात पुरामुळे अनेकांचे नुकसान झालंय, त्याकडे सरकारचं लक्ष नाही. मात्र, सरकार यात्रा काढत बसले आहे. राज्यात यात्रांचा पूर सुरू असल्याचा आरोप करत वडेट्टीवार यांनी हल्लाबोल केला.

पाच वर्ष यांच्याकडे सत्ता होती. या वर्षात कामे केली असती तर सरकारला यात्रा काढण्याची गरजच पडली नसती. यात्रेच्या माध्यमातून सरकार जनतेची दिशाभूल करत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details