नागपूर -बांगलादेशमध्ये राहणाऱ्या महिलांची तस्करी करणाऱ्या रॅकेटचा भांडाफोड ( Bangla Women Trafficking Racket ) करण्यात नागपूर गुन्हे शाखा पोलिसांना ( Nagpur Crime Branch Police ) मोठे यश आले आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असणाऱ्या तरुणींना भारतात काम मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांना बेकायदेशीर भारतात आणल्यानंतर देहव्यवसायात लोटले जाणार होते. अशा दहा महिलांची सुटका करण्यात गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या सर्व महिला आणि एक पुरुष हावडा-सुरत एक्सप्रेसने प्रवास करत होते. त्यांच्या हालचाली संशयास्पद वाटत असल्याची सूचना यासंदर्भात दहशतवाद विरोधी पथकाकडून ( Anti-Terrorism Squad ) नागपूर पोलिसांना प्राप्त झाली. त्यानंतर नागपूर पोलिसांनी देखील तत्परता दाखवत सर्व महिलांची सुटका केली आहे.
पोलिसांच्या तपासात या सर्व महिला बांगलादेश येथील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. मात्र या आंतरराष्ट्रीय टोळीचा सूत्रधार पोलिसांच्या हाती लागलेला नाही. मानवी तस्करी टोळीने या महिलांना बेकायदेशीरपणे भारतात आणल्यानंतर त्यांना देशातील मोठ्या शहरांमध्ये देहव्यवसायात लोटले जाणार होते. पोलिसांनी नागपूर रेल्वे स्थानकावर या महिलांची सुटका केली. तेव्हा संपूर्ण गाडी तपासली असता मुख्य सूत्रधार हाती लागलेला नाही. पोलिसांनी ज्या दहा बांगलादेशी महिलांची सुटका केलेली आहे. त्यांच्याकडे आपले नागरिकत्व सिद्ध करणारा कोणताही ठोस पुरावा नसल्याचा खुलासा पोलिसांच्या तपासात झाला आहे.
परराष्ट्र मंत्रालयामार्फत चौकशी होणार!