महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कसा तयार होतो गुलाल? किती सुरक्षित? धुळवडीच्या आधी जाणून घ्या माहिती

होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते, तो कसा तयार होतो? हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल. त्यामुळे, आज गुलाल कसा तयार केला जातो हे तुम्हाला दाखवणार आहोत.

admane family Gulal make information
admane family Gulal make information

By

Published : Mar 16, 2022, 11:48 AM IST

नागपूर - उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवडीला वेगळेच महत्त्व आहे. मनसोक्तपणे रंगांची उधळण करणाऱ्या प्रत्येकाला होळीची प्रतीक्षा असते. आपल्या देशातील काही भागात तर होळी खेळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. मात्र, होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते, तो कसा तयार होतो? हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल. त्यामुळे आज गुलाल कसा तयार केला जातो हे तुम्हाला दाखवणार आहोत.

माहिती देताना आदमने कुटुंब

हेही वाचा -Heat Wave in Vidarbha : येत्या दोन दिवसात विदर्भात उष्णतेची लाट येणार- हवामान खात्याचा इशारा

नागपुरातील वाठोडा येथील श्रीकृष्ण नगरमध्ये आदमाने कुटुंब गेल्या तीन पिढ्यांपासून गुलाल तयार करण्याचे काम करत आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाल तयार करण्यासाठी मक्याचे पीठ म्हणजेच आरारोट, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ते मिश्रण उन्हात वाळवले जाते, त्यानंतर तयार होतो गुलाल.

गेल्या काही वर्षांत होळीचे रूप आणि स्वरूप दोन्ही बदलले आहे. पारंपरिक रंगांच्या जागी रासायनिक रंगांचा वापर वाढला आहे. त्यामुळेच, त्वचा विकार देखील वाढू लागले आहेत. रासायनिक रांगांमुळे नुकसान होत असल्याने अनेकांनी इच्छा नसताना देखील धुळवड खेळने देखील सोडून दिले. त्यामुळे, आता होळीत ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांची मागणी केली जात आहे. त्यातही आता केवळ गुलालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागपुरातील आदमने कुटुंबाची तिसरी पिढी गुलाल तयार करण्याचे काम करत आहे. ते वर्षभर गुलाल तयार करून तो होळी, गणेशोत्सव, दिवाळीसह निवडणुकीत विक्री करतात.

दोन वर्षांनी गुलालाची मागणी वाढली -

गुलाल तयार करणे हा आदमने कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आज तिसरी पिढी या कामात गुंतलेली आहे. गुलाल तयार केल्यानंतर तो विकूनच आदमने कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र, गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे गुलालाची मागणी कमी झाली होती. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे गुलालाची मागणी वाढली असल्याचे ते सांगतात.

गुलाल तयार करताना नैसर्गिक पद्धतीचा अवलंब-

होळी असो की, निवडणुकीच्या मिरवणुका किंवा निकाल, यामध्ये सर्वात जास्त गुलालाची मागणी केली जाते. लोकांमध्ये रंगाच्या संदर्भात जागृती आल्यामुळे हर्बल रंगांची मागणी वाढली आहे. त्यातही गुलाल नैसर्गिक पद्धतीने तयार केला जात असल्याने गुलालाची सर्वाधिक मागणी आहे. गुलाल तयार करताना आरारोट (मका पावडर), रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. यापासून तयार होणारा गुलाल मुळीच हानिकारक नसल्याचा दावा आदमने कुटुंबीयांनी केला आहे.

हेही वाचा -Cat Show in Nagpur : अमेरिकन मेनकूनचा आकाराने तर बेंगॉली कॅटच्या रंगाने वेधले लक्ष

ABOUT THE AUTHOR

...view details