नागपूर -उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये सर्वच जण विविध ठिकाणी सुट्ट्या घालवण्यासाठी जात असतात. यात संबंधित ठिकाणाचे फोटो सोशल मीडियावर अपलोड केले जातात. नेमक्या याच गोष्टीचा फायदा घेत नागपुरात अनेक घरांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समोर आले आहे. दुपारच्या वेळेत घरांची रेकी करून कोणत्या घराच्या दाराला कुलूप लावलेले आहे. कोण बाहेर गावी गेले आहे. कधी परत येतील, या सर्व बाबींचा कानोसा घ्यायचा आणि रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत घरफोड्या करायच्या अशा प्रकारच्या घटना वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये शहरातील विविध भागात तब्बल 44 पेक्षा अधिक घरफोडीच्या घटना ( More than 44 burglary cases Nagpur ) घडल्या आहेत. महत्वाचे म्हणजे बहुतांश चोरीच्या घटनेतील घर मालक बाहेरगावी ( Theft when homeowner goes to another village for tourism ) गेलेले आहेत. त्यामुळे आपण सोशल मीडियावर अपलोड केलेले पर्यटनाचे फोटो ( Theft as photos of tourism posted on social media ) हे चोरट्यांसाठी माहितीचे स्त्रोत ठरत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे नागपुरात चोरीचे प्रमाणही वाढले आहे.
'या' भागांवर चोरट्यांची नजर :नागपूरचा विस्तार वेगाने होतो आहे. शहराची सीमा विस्तीर्ण होत असल्याने आउटर भागात घरांची संख्या विरळ आहे. याचाच फायदा घरफोडी करणारे चोर घेताना दिसत आहेत. यामध्ये हुडकेश्वर आणि बेलतरोडी भागांचा समावेश आहे. तर शहरातील उच्चभ्रू वस्ती समजल्या जाणाऱ्या बजाजनगरमध्ये सुद्धा चोरांचा सुळसुळाट वाढला आहे.