नागपूर - गृहमंत्री झाल्यानंतर गुरुवारी दिलीप वळसे-पाटील पहिल्यांदा नागपूरला आले. आज त्यांनी विविध विभागांच्या आढावा बैठका घेतल्या. आज सकाळी त्यांनी पवित्र दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेबांच्या पावन स्मृतीला अभिवादन केले. पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्रालायाने नियोजन केले आहे, सगळ्या विभागात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता आज नागपूर विभागाची आणि उद्या अमरावती विभागाची बैठक घेत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे
पोलिसांच्या अडचणी समजून घेऊन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी प्रयत्न - गृहमंत्री - दिलीप वळसे पाटलांची ईडी करावाईवर प्रतिक्रिया
पोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी गृहमंत्रालायाने नियोजन केले आहे, सगळ्या विभागात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेणे, त्यांच्या अडचणी समजून घेणे आवश्यक आहे. त्याकरिता आज नागपूर विभागाची आणि उद्या अमरावती विभागाची बैठक घेत असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे
केंद्राच्या तपास एजन्सींचा बेछूट वापर करून राजकीय विरोधकांना नेस्तनाबूत करण्याचा प्रयत्न केंद्र सरकारचा आहे. यापूर्वी केंद्रीय संस्थांचा कधी वापर झाला नाही, हा वापर योग्य नसल्याचे ते म्हणाले. फोन टॅपिंगचे प्रकरण न्यायालयीन बाब असल्याने न्यायालयात उत्तर देणे योग्य राहील असे देखील वळसे-पाटील म्हणाले.
चौकशी आयोगाच्या समोर जे कामकाज सुरू आहे, त्यावर आता बोलणे योग्य होणार नाही, आयोगासमोर काय माहिती आली हा चौकशीचा भाग असल्याने त्यावर बोलता येणे शक्य नसल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील परमबीर सिंह प्रकरणी म्हणाले.
सुबोध जैस्वाल प्रकरणावर म्हणाले की, या विषयाच्या अनुषंगाने अनेक बातम्या पुढे येतात मात्र त्या सगळ्याच बातम्यांमध्ये सत्य नसते, यासंबधी हायकोर्टात याचिका दाखल झाली आहे. त्यात काय येते हे बघावे लागेल, असं गृहमंत्री म्हणाले