नागपूर- राज्यातील पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांना घरे देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. पण कोरोनामुळे जी परिस्थिती निर्माण झाली ती पाहाता राज्य सरकार घरे बांधू शकणार नाही. त्यासाठी वेगवेगळ्या पद्धती वापरुन प्रसंगी खासगी विकासकांची मदत घेऊन राज्यात पोलिसांसाठी एक लाख घरे बांधली जातील, अशी घोषणा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
नागपूरमध्ये पोलिस महासंचालक शिबिर कार्यालयासह पाचपावली आणि इंदोरा येथील पोलीस अमलदारांच्या शासकीय निवासस्थानाचे उद्धाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऊर्जामंत्री तथा पालकमंत्री नितीन राऊत उपस्थित होते.
राज्यात पोलिसांसाठी एक लाख नवी घरे बांधणार - गृहमंत्री अनिल देशमुख
राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे घरे बांधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देणार असेल, तर त्याला ४ एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधण्यात येतील घरे -
राज्यात पोलिसांसाठी घरे कमी आहेत. त्यामुळे घरे बांधण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहे. एखादा बिल्डर आपल्या जागेवर पोलिसांसाठी घर बांधून देणार असेल, तर त्याला ४ एफएसआय आणि इतर सुविधा देण्याचा विचार सुरु आहे. ही सर्व घरं पोलीस हाऊसिंग कॉर्पोरेशनच्या नावानेच बांधण्यात येईल, असे गृहमंत्री देशमुख म्हणाले.
यावेळी पोलीस अंमलदार यांच्या कुटुंबियाना प्रातिनिधिक स्वरूपात चाव्या सोपविण्यात आले. यावेळी कुटुंबियांसोबत चावी स्वीकारताना पोलिसांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.
शासकीय निवासस्थानांचा उद्धाटन सोहळ्यात पोलीस महासंचालक, नागपूरचे पोलीस आयुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक, पोलीस अधीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.