नागपूर - बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे. केंद्र सूडाच्या भावनेतून कारवाई करत असल्याचा आरोप सुरू झाले आहेत. या संदर्भात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
भाजप नेत्यांविरुद्ध बोलल्यास त्यांच्यामागे ईडी-सीबीआय लावली जाते - गृहमंत्री - गृहमंत्री अनिल देशमुखांची ईडीवर टीका
भाजप ईडीचा वापर राजकीय स्वार्थासाठी करत असल्याचा आरोप गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना सक्तवसुली संचलनालयाने (ईडी) नोटीस बजावल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ माजली आहे.
![भाजप नेत्यांविरुद्ध बोलल्यास त्यांच्यामागे ईडी-सीबीआय लावली जाते - गृहमंत्री home minister anil deshmukh criticism of ED's action](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-10034298-86-10034298-1609149692601.jpg)
केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या धोरणाविरुद्ध आणि नेत्यांविरुद्ध कुणी काहीही वक्तव्य केले, तर त्यांच्यामागे ईडी आणि सीबीआय लावण्याचं काम केंद्राकडून सुरू झालेलं असल्याचं गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले आहेत. यामुळे आमच्या सरकारनं राज्यात आमच्या परवानगीशिवाय सीबीआयला तपास करता येणार नसल्याचा निर्णय घेतला होता, मात्र केंद्र सरकार ज्या पद्धतीने ईडीचा दुरुपयोग करत आहे, अशी पद्धत महाराष्ट्राने या पूर्वी कधीही बघितली नसल्याचं देखील ते म्हणाले आहेत
काय आहे प्रकरण -
खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली आहे. पीएमसी बँक घोटाळ्याप्रकरणी वर्षा राऊत यांना नोटीस बजावण्यात आली आहे. मंगळवारी (29) रोजी त्यांना ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आलं आहे. कलम ६७ अंतर्गत ही नोटीस बजावण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वर्षा राऊत यांना ईडीच्या चौकशीला सामोरं जावं लागणार आहे. वर्षा राऊत आणि प्रवीण राऊत यांच्यात ५० लाख रुपयांचा व्यवहार झाला आहे. त्यावरून ईडी या आर्थिक व्यवहाराची पार्श्वभूमी तपासणार आहे, त्यासाठी वर्षा राऊत यांना नोटीस बजाण्यात आली आहे.