महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Holika Dahan 2022 : पर्यावरण रक्षणासाठी होळी दहनात लाकडाला 'गो कास्ट'चा पर्याय - लाकडाला गो कास्टचा पर्याय

होलिका दहनासाठी ( Holika Dahan 2022 ) मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड केली जाते. तसेच, पर्यावरणाची हानी देखील होते. यासाठी नागपूरच्या गोरक्षण संस्थेने गो कास्ट नावाचे लाकूड तयार केले ( Go Cast Alternative To Wood ) आहे.

Go cast
Go cast

By

Published : Mar 16, 2022, 6:55 PM IST

नागपूर - होळीच्या दिवशी ( Holika Dahan 2022 ) संपूर्ण देशभरात लाखो ठिकाणी मोठ-मोठ्या होलिकांचे दहन केले जाते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात जंगलातील वृक्ष तोडणी करण्यात येते. परिणामी शिल्लक राहिलेले जंगल सुद्धा संपवण्यात येत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी नागपूरच्या गोरक्षण सभा या संस्थेने गो कास्ट नावाचे लाकूड तयार केले ( Go Cast Alternative To Wood ) आहे. गायीच्या शेणाचा उपयोग करून तयार केलेल्या गो कास्ट मुळे अनेक समस्या निकाली निघतील, असा दावा गोरक्षण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

भारतीय संस्कृतीत प्रत्येक सण आणि उत्सवाला वेगळेच महत्त्व आहे. मात्र, बदलत्या काळानुसार हे उत्सव साजरे करण्याची पद्धतही बदलत आहे. होळीचा सण हा केवळ रंग खेळण्यापुरता मर्यादित झाला असला, तरी होलिका दहणाचे महत्त्व अजूनही कायम आहे. भारतात एकाच वेळी लाखो ठिकाणी होलिका दहन केले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष तोड होत असल्याने पर्यावरण धोक्यात येते ही दरवर्षीची ओरड आहे.

पर्यावरणाच्या समतोलालासाठी गोकास्टची निर्मिती

केवळ गायीच्या शेणापासून तयार झालेल्या गो-कास्टचा उपयोग केवळ होलिका दहन करतानाच होणार नाही. तर, धार्मिक विधी आणि होम- हवनच्या उपयोगात येणार आहे. पंचगव्यात शेणाचा देखील समावेश होत असल्याने या गो कास्टला धार्मिक मान्यता असल्याचा दावा प्रसन्ना पातूरकर यांनी केला आहे.

गो कास्ट बद्दल माहिती देताना गोरक्षण संस्थेचे पदाधिकारी

पर्यावरणवाद्यांची ओरड संपेल

होलिका दहन करताना वृक्ष तोड करू नका, पर्यावरणपूरक होळी साजरी करा, निसर्ग सुरक्षित राहील या दृष्टीने विचार करा, असे आवाहन दरवर्षी केले जाते. मात्र, होलिका दहन करताना या आवाहनांकडे कुणीही फारसे लक्षच देत नाही. उलट सर्रासपणे हजारो झाडांची कत्तल केली जाते. पण, भविष्यात गो कास्टचा योग्य प्रचार आणि प्रसार झाल्यास वृक्ष कत्तल कमी होईल, असा विश्वास गोरक्षण सभेच्या पदाधिकाऱ्यांनी आहे.

गोकास्टचे उत्पादन वाढवणार

आजच्या परिस्थितीत गोरक्षण सभेकडे एकूण एक हजार गायी आहेत. साधारणपणे दिवसाला पाचशे ते सातशे किलो शेण रोज जमा होते. एरवी या शेणापासून गौरी तयार केल्या जायच्या तरी देखील शेण संपत नसे. मात्र, आता गोरक्षण सभेने गो कास्ट तयार करण्याची कला अवगत केल्यानंतर मशीनच्या मदतीने उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. यावर्षी हा प्रयोग प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आला होता. ज्याला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. यापुढे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेणार असल्याची माहिती प्रसन्ना पातूरकर यांनी दिली आहे.

हेही वाचा -Manisha Kayande On Pravin Darekar : प्रवीण दरेकर फरार आहेत का?, शिवसेनेने विधानपरिषदेत भाजपाला डिवचले

ABOUT THE AUTHOR

...view details