नागपूर - येत्या काळात आदिशक्तीच्या नवरात्र उत्सवाला ( Navratri Festival 2022 ) सुरुवात होणार आहे. त्यानिमित्ताने विदर्भात प्रसिद्ध असलेल्या कोराडीच्या जगदंबा मातेची आख्यायिका आपण जाणून घेणार आहे. नवसाला पावणारी आई म्हणून देखील कोराडीची देवी प्रसिद्ध ( Jagdamba koradi Mandir ) आहे. पूर्वी कोराडी हे जाखापूर या नावाने ओळखले जात असे. जाखापूरचा राजा झोलन ( Jakhapur king Zolan ) याला सात पुत्र होते. जनोबा, नानोबा,बानोबा, बैरोबा, खैरोबा, अग्नोबा आणि दत्तासूर. परंतु एकही कन्यारत्न नसल्याने राजा दु:खी होता. त्याने यज्ञ, हवन, पूजा, तपश्चर्या करून देवाना प्रसन्न केले आणि एक कन्यारत्न मागितले. दिव्य, पवित्र, तेजोमय रुपगुणसंम्पन्न कन्येच्या रुपाने अवतरलेल्या आदिमायेच्या अनेक दिव्य अनुभूती राजाला येत असत. तिने राजाला अनेक कठीण प्रसंगात मार्गदर्शन करून योग्य निर्णयाप्रत पोहचवले. एका युद्ध प्रसंगी तिने राजाच्या शत्रुविषयी देखील योग्य निर्णय देऊन न्यायप्रियतेचे दर्शन घडवले. झोलन राजाला आदिमायेच्या दिव्य शक्तीचा पुन:प्रत्यय आला. अवतारकार्य पूर्ण झाल्यामुळे सूर्य मावळल्यानंतर देवी ज्या स्थानी विराजमान झाली, ते ठिकाण म्हणजे जाखापूर.साक्षात शक्तीपीठआहे.
हेमाडपंथी बांधकाम -श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, ( Sri Mahalakshmi Jagdamba Institute Koradi ) हे नागपूरच्या उत्तरेस जवळपास 15 कि.मी. अंतरावर आहे. कोराडी देवी मंदिर ( Koradi Temple ) परिसराचे अगोदरच्या काळी 'जाखापूर' हे नाव होते. आई जगदंबेची मूर्ती स्वयंभू आहे. मंदिराचे बांधकाम हेमाडपंथी आहे. त्यावरून मंदिराची प्राचीनता लक्षात येते. हिंदू जीवनाचे आधारस्तंभ धर्म, अर्थ, काम, मोक्ष चारही पुरुषार्थात देवीच्या दर्शनाने यश मिळते. अशी भक्तांची श्रद्धा आहे.झोलन राजा आणि जकुमाबाईची अख्यायिकाझोलन राजाच्या पत्नीला म्हणजेच राणी गंगासागर यांना कन्यारत्न झाले. कन्येचा जन्म होताच नगरातील प्रजा खूप आनंदात झाली. जिकडे तिकडे उत्सव साजरे केले जात होते. राजकन्येला बघण्यासाठी आल्यानंतर आईची स्वर्णीम कांती, उज्ज्वल तेज, सौम्य हास्य, अत्यंत आकर्षक मुखमंडळ, तेजस्वी डोळे, आकर्षक कान, भव्य मस्तक असे कन्येचे रुप पाहून राजाचे नेत्र दिपत होते. राजाला असे वाटले की कन्या नसून दिव्य शक्ती आपल्या घरी मुलीच्या रुपाने अवतरली आहे. नंतर शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे आई जाकुमाई वाढू लागली. त्यांचे सर्वतोमुखी दिव्य तेज आणि सुंदरता याची राजवाड्यात चर्चा होऊ लागली.
अप्रतिम सौंदर्य आणि लग्नाची मागणी -झोलन राजाच्या नगराच्या सीमेपलीकडील भागामध्ये किराड राजाची नगरी होती. किराड राजाची कन्या जंगलात फिरत फिरत मैत्रिणी सोबत आणि काही निवडक सैन्यासोबत झोलन राज्याच्या नगरात प्रवेश केला. राजाच्या सैनिकांनी अनोळखी व्यक्ती आपल्या सीमेत आलेली पाहून राजासमोर आणले. तेव्हा झोलन राजाची कन्याजाकुमाई राजदरबारात उपस्थित होती. झोलन राजाने सर्व विचारपूस केल्यानंतर सन्मानाने त्याच्या नगरीत पाठवून दिले. तेव्हा किराड राजाच्या कन्येने झोलन राजाची मुलगी, तिचे अप्रतिम सौंदर्य आपल्या वडिलांना सांगितले. किराडच्या राजाने झोलन राजाच्या मुलीला आपल्या मुलांसाठी मागण्याचा मनात विचार केला. त्याबाबत राजाने दुतामार्फत संदेश पाठवला.
जकुमाऊने दुताला सांगितले आम्ही युद्धास तयार -मात्र झोलन राजाने हा प्रस्ताव नाकारला. नंतर किराड राजाला संताप आला व रागाच्या भरात त्याने झोलन राजाला दूत पाठवून युद्धासाठी तयार होण्याचे सांगितले. अन्यथा मागण्या मान्य करण्यासाठी दबाव आणला. प्रस्ताव ऐकल्यानंतर राज्यसभेत जकुमाईने दुताला सांगितले की आम्ही युद्धासाठी तयार आहोत. असे म्हणताच त्या क्षणी झोलन राजा जाकुमाईकडे पाहतच राहिले. झोलन राजाला हे माहिती होते, की ही दैवशक्ती आहे. त्यामुळे राजाला जाकुमाईच्या प्रस्थावाला दुजोरा दिला.