नागपूर - विदर्भात फार जास्त प्रमाणात पाऊस ( Heavy rain in Vidarbha ) झालेला आहे. वर्धा जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस हिंगणघाट तालुक्यामध्ये ( Highest rainfall in Hinganghat taluka ) झाला आहे. चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने ( Heavy rain in Gadchiroli district ) जनजीवन विस्कळीत झाले आहे. तसेच पुरस्थितीमुळे शेतीच्या नुकसानासह जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न नीर्माण झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Deputy Chief Minister Devendra Fadnavis ) सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवुन आहेत. ही आपत्कालीन परिस्थिती ( Emergency situation in Vidarbha) असून आम्ही प्रशासनाच्या संपर्कात आहोत असे ते म्हणाले. मंगळवारी वर्धा, चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार ( Fadnavis will visit Chandrapur ) असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच विदर्भाची आढावा बैठक घेणार असल्याचे फडणवीस म्हणाले. ते नागपुरात आले असता विमानतळावर पत्रकांराशी संवाद साधत होते.
मागील चोवीस तासांत चिमूर तालुक्यात ( Heavy rain in Chimur taluka ) झालेल्या संततधार पावसामुळे पुरजन्य परिस्थिती ( Flood situation) निर्माण झाली आहे. अनेक गांवात पाणी साचले असून एकूण 13 जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे. तालुक्यातील उमा नदी ( Uma River ) सातनाल्याच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊन चिमूर शहरास पाण्याने वेढा ( Chimur city surrounded Flood ) दिला. ज्यात पेठ मोहल्ला, चावडी, खाती कामठा, मानीक नगर, क्रांती नगर, उप जिल्हा रुग्णालय व परीसरातील घरात पाणी घुसले. तसेच तालुक्यातील अनेक गांवाना पुरांचा फटका बसला आहे. तसेच नगर परीषद क्षेत्रातील सोनेगाव, शेडेगाव, गडपिपरी, खरकाडा, पिपंळनेरी, काग-सोनेगाव या गावांनाही पाण्याने वेढले आहे. प्रशासनाच्या आणि स्थानिक लोकांच्या मदतीने अनेक कुटूंबांना सुरक्षीतस्थळी हलविले. पुरग्रस्तांची तात्पुरत्या स्वरूपात शहिद बालाजी रायपुरकर सभागृह ( Shaheed Balaji Raipur Hall ) येथे व्यवस्था केल्याची माहीती नगर परीषद अधिक्षक प्रदिप रणखांब यांनी दिली.
हेही वाचा -Presidential Election : राष्ट्रपती पदासाठीच्या निवडणुकीसाठी २८३ सदस्यांनी बजावला मतदानाचा हक्क
याही गावांना बसला फटका -चिमूर तालुक्यातील कवडशी, केसलापुर, अमरपुरी भान्सुली, सरडपार, चिखलापार, नेरी, नवतळा, कोटगाव, पांढरवानी, किटाळी (तुकुम), भिसी इत्यादी गावासह अनेक गावांना पुरांचा फटका बसला आहे. चिमूर तालुक्यातील जांभुळधाट, कोटगाव, नवतळा, चिमूर-नेरी, नेरी-शिवन, पायली, खडसंगी, मुरपार, मिनझरी, अमरपुरी,भान्सुली, चिमूर-भिसी हे मार्ग बंद झाले आहेत.