महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jun 8, 2021, 10:33 PM IST

ETV Bharat / city

नागपुरात जोरदार पावसाची हजेरी; वादळी वाऱ्याने झाडांची पडझड

नागपुरात आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास एक तास बरसला. आजपासून मृग नक्षत्राला सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी पावसाच्या दमदार हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला.

Nagpur rain trees damage
नागपूर पाऊस झाडे नुकसान

नागपूर - नागपुरात आज वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने दमदार हजेरी लावली. दुपारी दीड वाजताच्या सुमारास सुरू झालेला मुसळधार पाऊस जवळपास एक तास बरसला. आजपासून मृग नक्षत्राला सुरवात झाली असून पहिल्याच दिवशी पावसाच्या दमदार हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला. अचानक झालेल्या पावसाने बाहेर पडलेले नागरिक मात्र पावसात भिजले. तर, शहराच्या काही भागांत झाडांची पडझड झाली.

पावसाचे दृश्य

वातावरणात गारवा निर्माण झाला

मागील दोन दिवसांपासून तपमानाचा पारा 40 च्या पुढे होता. अधून मधून तुरळक पडणाऱ्या पावसाने उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आज झालेल्या दमदार पावसाने वातावरणात गारवा निर्माण झाला. पावसामुळे शहरातील काही भागांत झाडांच्या फांद्या तुटून पडल्या. यात शहरातील माटे चौकात झाड तुटून रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. झाडाच्या फांद्या छाटून रस्त्यावरील झाडे बाजूला करून मार्ग मोकळा करत वाहतूक सुरळीत करण्यात आली. याच मार्गावर आणखी दोन ते तीन ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याच्या घटना घडल्या आहे.

स्ट्रीट व्हेंडरला पावसाचा जोरदार फटका

नेमका अनलॉकचा दुसरा दिवस असल्याने शहरात ठिक ठिकाणी लागणाऱ्या स्ट्रीट व्हेंडरला पावसाचा जोरदार फटका बसला. तेच खरेदीच्या अनुषंगाने घराबाहेर पडलेले अनेक जण विना छत्री आणि रेनकोटमुळे पावसात भिजले.

हेही वाचा -नागपुरात नशा करणाऱ्या तरुणाने केली भिकाऱ्याचा हत्या

शहरात मान्सून पूर्व पाऊस अनुभवायला मिळाला आहे. मान्सूनचा पाऊस विदर्भात येणासाठी एका आठवड्यापेक्षा जास्त कालावधी लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विदर्भात होणारा मान्सूनचा पाऊस हा बंगालच्या उपसागरात होणाऱ्या हवामान बदलाचा नंतर होत असतो. सध्या मान्सून पूर्व वातावरण निर्माण झाले असल्याने अधून मधून अशा पद्धतीने पाऊस अनुभवायला येईल, असाही अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

हेही वाचा -कचरा वेचणाऱ्याची नशेडीकडून निर्घृण हत्या; नागपुरमधील प्रकार

ABOUT THE AUTHOR

...view details