नागपूर - मागील काही दिवसापासून शहरात उकाडा वाढला होता. मात्र, आज दुपारनंतर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. तब्बल तासभर बरसलेल्या पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाल्याचे दिसून आले.
शहरात कडक उकाड्यानंतर मुसळधार; वातावरणात पसरला गारवा
मागील अनेक दिवसांपासून उकाड्याने त्रस्त असलेल्या नागपूरकरांना दिलासा मिळाला आहे. आज दुपारनंतर शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यानंतर परिसरात गारवा पसरला आहे.
सध्या राज्यात परतीच्या पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसतोय. नागपुरातही आज दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसापासून शहरात उन्हामुळे प्रचंड उकाडा वाढला होता. त्यामुळे नागरिकही त्रस्त झाले होते. मात्र, मुसळधार पाऊस बरसल्याने नागरिकांना यापासून दिलासा मिळाला आहे. शिवाय अचानक बरसलेल्या पावसामुळे अनेकांची तारंबळ उडाल्याचेही चित्र पाहायला मिळाले. असे असले तरी तासभर बरसलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. सोबतच अधूनमधून पावसाच्या सरी बरसतच आहेत.
हेही वाचा -'रेमडेसिव्हिर औषधांच्या वापराबाबत लवकरच टास्कफोर्स नेमणार, गैरवापर होऊ देणार नाही'