महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 8, 2021, 5:31 PM IST

Updated : Jul 8, 2021, 8:38 PM IST

ETV Bharat / city

नागपूरला मुसळधार पावसाने झोडपले, अनेक घरात शिरले पावसाचे पाणी

मागील काही दिवसात पाऊस न झाल्याने वातावरणात दमटपणाने नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत होता. दिवसभर घामाच्या धारा वाहत असून उकाडा त्रासदायक ठरत होता. पण सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने वतावरणात गारवा झाला आहे.

पाऊस सुरूच
पाऊस सुरूच

नागपूर -नागपुरातसकाळपासून संततधार पाऊस बरसला. यामध्ये सकाळी साधारण पाऊस होता. पण दुपारी 12 वाजेनंतर झालेल्या मुसळधार पावसाने नागपूरला झोडपून काढले. यात शहरातील पूर्व आणि उत्तर नागपूरमध्ये खोलगट भागात तर काही ठिकाणी सिमेंट रस्त्यांमुळे घरात पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.

नागपुरात पहाटेपासून संततधार पावसाला सुरुवात

नागरिकांची पहिल्याच पावसात दाणादाण

शहारतील पूर्व नागपुरात हिवरी नगर श्रीकृष्ण नगर, नंदनवन या ठिकाणी बऱ्याच घरात पाणी गेल्याने नागरिकांची पहिल्याच पावसात दाणादाण उडाली. यात नागरिकांना झालेल्या त्रासामुळे मनपाच्या ढिसाळ कारभाराला जवाबदार ठरवले. यासोबतच शहरातील उत्तर नागपूर ज्यामध्ये हुडको कॉलनी, बारा खोली, एनआयटी भागात जवळपास अडीच फूट पाणी साचलेले आहे. मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहचालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते आहे. तर काही घरात सुद्धा पावसाचे पाणी शिरल्याने घरातील सहित्य, वस्तूचे नुकसान झाले. दरम्यान, अनेक भागात गटार लाईन नसल्याने अशा पद्धतीने दरवर्षी समस्या उद्भवत असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. वेळोवेळी नगरसेवक, मनपा प्रशासनाला सांगून कायमस्वरूपी तोडगा न निघाल्याने पावसाळ्यात या समस्यांना सामोरे जावे लागते. परिणामी नुकसान होऊन काहीच नुकसान भरपाई मिळत नसल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे.

नागपुरात मुसळधार पावसाने झोडपले, अनेक घरात शिरले पावसाचे पाणी

नागपुरात ऑरेंज अलर्ट
नागपूर जिल्ह्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त केला जात असून हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट घोषित केला आहे. यात आज दिवसभर 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यातच 9 जुलैला एक दोन ठिकाणी वादळी वारा विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे. तेच 10 ते 12 जुलै दरम्यान अनेक ठिकाणी काही भागात मध्यम तर काही भागात तुरळक स्वरूपाचा पाऊस पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

अनेक घरात शिरले पावसाचे पाणी

दुबार पेरणीचे ओढावले होते संकट

जून महिन्यात अगदी सुरुवातीला झालेल्या पावसाने मान्सून सक्रिय झाल्याचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला. त्यात काही ठिकाणी समाधानकारक झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी पेरणी करून घेतली. मात्र त्यानंतर जूनच्या शेवटच्या आठवड्याच्या पूर्वीच तुरळक स्वरूपाचा पाऊस काही भागात पडला. पण शेतीला उपयोगी पाऊस नसल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. यामुळे काही ठिकाणी दोन आठवड्यांपेक्षा अधिक दिवस पाऊस लांबल्याने दुबार पेरणीचे संकट ओढावले होते. यात बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण होत नसल्याने पाऊस केव्हा बरसतो याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. यात पावसात खंड पडल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असे आवाहन कृषी विभागाकडून केले जात होते.

अनेक घरात शिरले पावसाचे पाणी

जिल्ह्यातील सर्वच भागात पाऊस

हवामान खात्याने बंगलाच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण शुक्रवार (ता.9 जुलै) पासून अंदाज वर्तविला होता. यात मात्र 24 तास पाहिले म्हणजेच गुरुवार मध्यरात्रीपासून काही भागात पावसाला सुरुवात झाली. यामुळे अनेक शेतकऱ्यांचा पिकाला जिवनदान मिळाले. काही भागात पाने पिवळी व्हायला लागल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली. पण अखेर जिल्ह्यातील सर्वच भागात सुरू असलेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला आहे.

संततधार पावसाने वतावरणात गारवा

मागील काही दिवसात पाऊस न झाल्याने वातावरणात दमटपणाने नागरिकांना गर्मीचा त्रास सहन करावा लागत होता. दिवसभर घामाच्या धारा वाहत असून उकाडा त्रासदायक ठरत होता. पण सकाळपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने वतावरणात गारवा झाला आहे. मध्यरात्रीपासून पाऊस सुरू झाला असताना पहाटे चांगलाच जोर धरला. जवळपास सहा तासापासून ही संततधार कायम असून दिवसभर असाच पाऊस राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दुपारी 12 नंतर पुन्हा पावसाने जोर पकडला आहे.

हेही वाचा - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा जेव्हा डोसा बनवतात....पाहा व्हिडिओ

Last Updated : Jul 8, 2021, 8:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details