महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Etv Bharat Special - नागपूरमधील महाराजबाग प्राणिसंग्रहालयात हिवाळ्यात लागले हिटर

ऐतिहासिक महाराजबाग प्राणि संग्रहालयातील (Maharaj Baug Zoo in Nagpur) प्राण्यांचे थंडीपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने प्राण्यांच्या शेलटर मध्ये हिटर (Heater installed in Zoo) बसवण्यात आले आहेत.

Maharajabag zoo
Maharajabag zoo

By

Published : Dec 2, 2021, 6:36 PM IST

नागपूर:-ऐतिहासिक महाराजबाग प्राणि संग्रहालयातील (Maharaj Baug Zoo) प्राण्यांचे थंडीपासून रक्षण करण्याच्या उद्देशाने प्राण्यांच्या शेलटर मध्ये हिटर (Heater installed in Zoo) बसवण्यात आले आहेत. पहिल्या टप्प्यात बिबट्या,अस्वल आणि पक्ष्यांच्या शेल्टरमध्ये हिटर बसवण्यात आले आहेत. मात्र, पुढील काही दिवसात थंडीचा प्रभाव आणखी वाढणार असल्याने वाघाच्या पिंजऱ्यात आणि इतर प्राण्यांच्या शेलटर मध्ये सुद्धा हिटर बसवण्यात येणार असल्याची माहिती महाराजबाग प्राणीसंग्रहालयाचे (Maharaj Baug Zoo) क्युरेटर डॉ. सुनील बावसकर यांनी दिली आहे. थंडीच्या काळात प्राण्यांना सर्दी पडसे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विशेष लक्ष दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

प्राणीसंग्रहालयात लावले हीटर
गेल्या आठ दिवसांपासून उपराजधानी नागपूरसह (Nagpur) विदर्भात थंडीचे दणक्यात पुनरागमन झाले आहे. सध्या नागपुरात दिवसाच्या वेळी तापमानाचा पारा हा १३ ते १४ अंश सेल्सिअस पर्यंत खाली आला आहे. तसेच रात्रीचे तापमान देखील ११ ते १२ अंशापर्यंतखाली उतरले आहे. या थंडीत मुक्या प्राण्यांची अवस्था काय होते याची कल्पना देखील करवली जात नाही.
हिटरची संख्या वाढवणार
नागपूर शहरातील ऐतिहासिक महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे (Maharaj Baug Zoo) व्यवस्थापन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी यावर तोडगा काढला आहे. ज्या प्राण्यांवर थंडीचा सर्वाधिक परिणाम होण्याची शक्यता आहे त्यांच्या शेलटर मध्ये गरम हवेचे हिटर बसवण्यात आले आहे. ज्यामुळे प्राणी असलेली खोली ऊबदार राहते. पुढे थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता असल्याने हिटरची संख्या आणखी वाढवली जाणार आहे.
प्राणीसंग्रहालयातील बिबट्या
थंडीचा जोर वाढणारनागपूरसह विदर्भात डिसेंबर महिन्यात थंडीचा जोर सर्वाधिक असतो, यावर्षी ढगाळ वातावरणामुळे नोव्हेंबर महिन्याच्या शेवटी फार थंडी जाणवली नसली तरी डिसेंबर महिना सुरू होताच थंडीची तीव्रता आणखी वाढलेली आहे. सध्या तापमानाचा पारा १० ते १४ अंश सेल्सिअसच्या मध्ये असला तरी येत्या काही दिवसात तापमान आणखी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहेहेही वाचा -Gujarat CM Visit Siddhivinayak Temple : भूपेंद्र पटेल यांनी घेतले सिद्धिविनायकाचे दर्शन

ABOUT THE AUTHOR

...view details