नागपूर - स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ( Swatantracha Amrut Mahotsav ) यावर्षी हर घर तिरंगा ( Har Ghar Tiranga ) हे अभियान उत्साहात राबवले जात आहे. या अभियानांतर्गत प्रत्येक भारतीयांना आपल्या घरावर भारतीय राष्ट्रध्वज म्हणजेचं तिरंगा झेंडा लावायचा आहे. मनात असलेले देशप्रेम व्यक्त करण्याची ही संधी असल्याने तिरंगा झेंडा विकत घेण्यासाठी आता सर्वसामान्य नागरिक दुकानांमध्ये गर्दी करू लागले आहेत. नागपूर शहरातील शुक्रवारी तलाव येथील खादी ग्रामोद्योग भवनात ( khadi gramodyog nagpur ) तर झेंडा विकत घेण्यासाठी ग्राहकांची रिग लागल्याचं चित्र निर्माण झाले आहे.
झेंड्याच्या विक्रीत तब्बल 75 टक्यांची वाढ - अचानकपणे तिरंगा झेंड्याची मागणी वाढल्याने झेंडयांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. उपराजधानी नागपूर शहरामध्ये ( Sub capital Nagpur ) केंद्र सरकारने घालून दिलेले सर्व निकष आणि नियमांसह तयार झेंडा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे खादी ग्रामोद्योग भवन. गेल्या आठ दिवसांपासून ग्राहकांची झेंडा विकत घेण्यासाठी नागपूरकरांची गर्दी इथे वाढली आहे. गेल्या 8 दिवसांमध्ये झेंड्याच्या विक्रीत तब्बल 75 टक्यांची वाढ झाल्याची माहिती खादी ग्रामोद्योग मंडळाचे सचिव एडवोकेट अशोक बनसोड यांनी दिली आहे.
सरकारने घालून दिलेल्या निकषाचे पालन -उपराजधानी नागपूर शहरामध्ये केंद्र सरकारने घालून दिलेले सर्व निकष आणि नियमांसह तयार झेंडा मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे शुक्रवारी तलाव येथील खादी ग्रामोद्योग भवन असल्याने गेल्या आठ दिवसांपासून नागपूरकरांची गर्दी इथे वाढली आहे. दुकानात येणाऱ्या दहा पैकी 9 ग्राहक हे झेंडा खरेदी करण्यासाठी येत असल्याची माहिती खादी ग्रामोद्योगचे अधिकारी सतीश चरडे यांनी दिली आहे.