नागपूर - तेलनखेडी हनुमान मंदिर (Telankhedi Hanuman Temple) हे नागपूर किव्हा विदर्भातीलचं नाही तर, मध्यभारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक आहे. भोसलेकालीन हे मंदिर असून सुमारे 300 वर्षांपेक्षा अधिकचा प्रगल्भ इतिहास या ऐतिहासिक मंदिराला लाभला आहे. भक्तांच्या हाकेला कायम ओ देणारे बजरंगबली म्हणून देखील तेलनखेडीचं हे मंदिर भक्तांमध्ये प्रसिद्ध आहे. संकटमोचन मोठे हनुमान मंदिर म्हणून देखील तेलनखेडीचं हे मंदिर ओळखलं जातं. एका छोट्याश्या टेकडीवर हनुमानाचे मंदिर स्थापित असून हनुमानाची मूर्ती दक्षिणमुखी आहे. तब्बल दोन वर्षानंतर हनुमान जयंती साजरी (Hanuman Jayanti 2022) करता येणार असल्याने मंदिरात विविध धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
भक्तांच्या नवसाला पावणारे तेलनखेडी हनुमान मंदिर - फुटाळा तलाव आणि सेमिनार हिलच्या अगदी मधे असलेल्या एका छोट्याच्या टेकडीवर आहे. हनुमानाची मूर्ती स्वयंभू असल्याने ती नेमकी कधी प्रकट झाली याची निश्चित माहिती कुणाकडे उपलब्ध नाही. मात्र जुन्या जाणकारांच्या मते मंदिर भोसले राजवटीच्या आधीचे आहे. सुमारे ३०० वर्षांपासून घनदाट जंगलात हनुमानाची मूर्त प्रगट आली होती, अशी आख्यायिका आहे, त्यानंतर जंगलात तपस्या करणाऱ्या साधू मुनींनी हनुमानाची मूर्ती तेलनखेडीच्या टेकडीवर स्थापित केली, तेव्हा पासूनच या मंदिराचे नामकरण तेलनखेडी हनुमान मंदिर असे झाल्याची माहिती मंदिरातील पुजाऱ्यांनी दिली आहे. गंगागिरी महाराजांनी मंदिराची निर्मिती केली. त्यानंतर महेशगिरी महाराजांनी मंदिराला विकसित केले आहे.
हेही वाचा -Hanuman Jayanti 2022 : दोन वर्षांनी जगातील सर्वांत मोठ्या मूर्तीसमोर साजरी होणार हनुमान जयंती