नागपूर- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव आज नागपूरच्या रेशीमबाग येथील संघाच्या हेडगेवार स्मृती भवन परिसरात संपन्न झाला. यावेळी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी अनेक विषयांवर आपले परखड मत मांडले. तर काही विषयांवर चिंता देखील व्यक्त केली आहे. आज देशात अराजकता माजवण्याचे पद्धतशीर प्रयत्न होत आहेत. देशाची एकता आणि अखंडतेवर सुनियोजित पद्धतीने आक्रमण करण्यात येत आहे असे सांगतानाच शत्रूने उगारलेला हात रोखण्याचे बळ हिंदू समाजात यायलाच हवे असे प्रतिपादन त्यांनी केले.
शत्रूने उगारलेला हात रोखण्याचे बळ हिंदू समाजात हवे असे आवाहन सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या विजयादशमी उत्सवात केले आहे. देशात तंत्रज्ञानाचा होत असलेला अतिरेक आणि ओटीटी प्लॅटफॉर्मचा बेजा वापर या कडे त्यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला,ते म्हणाले कोरोना प्रादुर्भावाच्या काळात विद्यार्थ्यांकडे मोबाईल आला आहे, मात्र त्या मोबाईलचा वापर कशासाठी केला जातोय या कडे कुणाचेही लक्ष नसल्याचं ते म्हणाले आहेत. याशिवाय देशातील तरुण ड्रग्जच्या प्रसाराला बळी असल्याच्या घटना वाढत आहे,यावर त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. गमावलेले स्वातंत्र्य आणि अखंडता परत मिळवण्यासाठी, गमावलेल्यांना परत मिळवण्यासाठी देशात भेदरहीत व समताधिष्ठित समाज आवश्यक असल्याचे ते म्हणाले आहे.
व्यवस्थेसोबत मन बदलणे आवश्यक -
जातीगत विषमता मोडून काढण्यासाठी व्यवस्थेसोबत मन बदलणे आवश्यक आहे. कारण भेदाभेद मनात उत्पन्न होतात. त्यातून ती उक्ती, कृती विचारात प्रकट होते. संवाद सकारात्मक व्हावा म्हणून संघ सामाजिक समरसता मंचाच्या माध्यमातून काम करीत आहे. जातीगत विषमता मनातून जाण्यासाठी अनोपचारिक संवाद हवा. यासाठी सणवार, जयंती, पुण्यतिथी मिळून काम केले पाहिजे असं मत सरसंघचालक मोहन भगवान यांनी व्यक्त केले आहे.