महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या रॅलीत सहभागी, मेट्रो उद्घाटनाच्या मुद्द्यावरून सरकारवर केली टीका - गुडीपाडवा रॅली देवेंद्र फडणवीस

नागपुरातील लक्ष्मीनगर चौक येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून आज गुडीपाडवा आणि नववर्षानिमित्ताने भव्य स्वागत रॅली ( Siddhivinayak Temple Trust rally Devendra Fadnavis ) काढण्यात आली. या रॅलीमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते.

New Year rally nagpur Devendra Fadnavis
सिद्धिविनायक ट्रस्ट रॅली नागपूर

By

Published : Apr 2, 2022, 11:49 AM IST

Updated : Apr 2, 2022, 1:07 PM IST

नागपूर - नागपुरातील लक्ष्मीनगर चौक येथील सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टकडून आज गुडीपाडवा आणि नववर्षानिमित्ताने भव्य स्वागत रॅली ( Siddhivinayak Temple Trust rally Devendra Fadnavis ) काढण्यात आली. या रॅलीमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे देखील सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राज्यातील जनतेला मराठी नव वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. प्रभू राम, लक्ष्मण, सीता यांच्या मूर्ती पालखीत बसवून मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध ढोल ताशा पथक यांनी रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. कोरोनाच्या दोन वर्षानंतर गुढीपाडवा साजरा होत असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह संचारला होता.

प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
रॅलीचे दृश्य

हेही वाचा -Fadnavis ON Uke : सतीश उकेंवर महाराष्ट्र पोलिसांच्या तक्रारीवरूनच ईडीची कारवाई:- देवेंद्र फडणवीस

अयोध्येत नवीन वर्ष साजरा करू : आज श्री रामाची मिरवणूक काढली जात आहे. योगा योगाने अयोध्येत प्रभू श्रीरामाचे भव्य मंदिर तयार होत आहे, त्यामुळे एकाद्या वर्षी अयोध्येत जाऊन नववर्षाचा दिवस साजरा करता येईल, असा विश्वास असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

सरकारे श्रेय घ्यावे, अपश्रेयाचे भागीदार होऊ नये : मुंबई मेट्रोच्या दोन प्रकल्पांचे आज उद्घाटन होत आहे, मात्र निमंत्रण पत्रिकेत विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव वगळण्यात आले आहे. यावर बोलताना फडणवीस म्हणाले की, माझ्या त्यांना शुभेच्छा आहेत. त्यांनी जरूर उद्घाटन करावे, मात्र जनतेला माहीत आहे की, या मेट्रोचे काम मी सुरू केले होते. आम्हाला बोलावले नाही तरी चालेल, पण सर्व मेट्रो सुरू करा. मेट्रो तीनचा प्रश्न निकाली काढा. सरकारने श्रेय घ्यावे, अपश्रेयाचे भागीदार होऊ नये, असा टोला देखील फडणवीस यांनी लगावला.

हेही वाचा -March Month Murder Cases Nagpur : नागपुरात फेब्रुवारीत शून्य तर मार्च महिन्यात 10 हत्येच्या घटना

Last Updated : Apr 2, 2022, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details