नागपूर - केंद्र सरकार 3 हजार कोटींचे हायड्रोजन मिशन राबवत आहे. सांडपाणी सोलरच्या सहाय्याने रिसायकल करून ग्रीन हायड्रोजन निर्माण करण्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे. यामुळे आता पेट्रोल, डिझेलवर चालणाऱ्या वस्तूंचा उपयोग बंद करायचा असून ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन होणार आहे. यासोबत भविष्यात भारत देश हा हायड्रोजन निर्यात करणारा देश बनवायचा असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले.
हेही वाचा -... तर नुकसान महाराष्ट्राचेच, विचार करावा लागेल; गडकरींचे मुख्यमंत्र्यांना पत्र
गडकरी हे नागपुरात माहनगर पालिकेच्या वतीने सांडपाणी रिसायकल करण्याच्या प्रकल्पाच्या लोकार्पण सोहळ्यात बोलत होते. शंकर नगर येथील गार्डनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस, माहापौर दयाशंकर तिवारी, आमदार प्रवीण दटके, विकास कुंभारे, यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
नागपूर मनपाने पुढाकार घेऊन शून्य किमतीच्या पाण्याचा उपयोग ग्रीन हायड्रोज निर्माण करण्यासाठी करावा, असेही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पर्यावरणाच्या दृष्टीने ग्रीन हायड्रोजन तयार करून जगातील पाहिले शहर लोकांच्या सहकार्याने बनवण्याचा माणस गडकरी यांनी बोलून दाखवला.
काय आहे लघू सांडपाणी पुनर्वापर प्रकल्प?