नागपूर:१४ ऑक्टोबर १९५६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर Dr Babasaheb Ambedkar यांनी नागपूरच्या पवित्र दीक्षाभूमीवर Nagpur sacred initiation grounds 5 लाख अनुयायांच्या साक्षीने बौद्ध धर्माची धम्म दीक्षा स्विकारली होती. या घटनेला आज ६६ वर्ष पूर्ण झाले आहेत. मात्र, ६६ वर्षांपूर्वी घडलेल्या त्या ऐतिहासिक घटनांच्या प्रत्येक क्षणांचे साक्षीदार असलेल्या ८५ वर्षीय गीता ताकसांडे आजीने त्यासर्व घटना डोळ्यात साठवून ठेवल्या आहेत. बाबासाहेब श्याम हॉटेलमध्ये मुक्कामी होते, तेव्हा गीता आजी आणि बाबासाहेबांची भेट झाली होती. त्या भेटीच्या आठवणी आजीच्या मनात आजही जश्याच्या तश्या ताज्या आहेत. गीता आजी गेल्या ३५ वर्षांपासून दीक्षाभूमीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बसून बाबासाहेबांचे फोटो विक्री करतात. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पावन स्मृतीस अभिवादन करण्यासाठी दीक्षाभूमी येथे येणारे अनुयायी गीता आजींची भेट घेतात, आणि आजीकडून बाबासाहेबांची गाथा ऐकूणच पुढे जातात.
अशी झाली बाबासाहेबांसोबत भेटमहामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना प्रत्यक्षात जवळून बघितले असे आता काहीच लोकं शिल्लक आहेत. त्यापैकी एक आहेत, ८५ वर्षीय आजी गीता ताकसांडे. बाबासाहेबांना याची देही याची डोळा बघणाऱ्या आजी अवघ्या १७ वर्षांच्या होत्या. तेंव्हा त्यांच्या जीवनात तो आनंदाचा क्षण आला. बाबासाहेब १९५६ ला नागपूरच्या दौऱ्यावर आले होते. तेव्हा ते श्याम हॉटेलमध्ये वास्तव्यास होते. त्यावेळी सीताबर्डी भागातील शेकडो समाजबांधवांनी बाबासाहेबांना बघण्यासाठी आणि भेटण्यासाठी श्याम हॉटेल बाहेर गर्दी केली होती. त्या गर्दीत १७ वर्षीय गीता सुद्धा होत्या. बाबासाहेब दिसतात गीता त्यांच्या पाया पडण्यासाठी खाली वाकली, तेव्हा बाबासाहेबांनी तिला पाया पडू दिल्या नाही. तिच्या डोक्यावरून हात फिरवत आस्थेने विचारपूस केली. त्यावेळी बाबासाहेबांनी गीता यांना यशस्वी होण्याचा आशीर्वाद दिला होता, असे गौरवोद्गार आजीने काढले. बाबासाहेबांनी दिलेला आशीर्वाद गीता आजीसाठी आयुष्यभराचा अभिमान देऊन गेला होता.