महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nagpur Crime - नातवानेच केला आजीचा खून, नागपूरमधील घटना - आजीचा खून केल्याची घटना

नातवानेच आजीचा खून केल्याची घटना घडली आहे. नातवाला उच्च शिक्षणासाठी अमेरीकेला जायचे असल्याने त्याने पैशांची मागणी केली होती. त्यामध्ये आजी वारंवार नकारात्मक बोलत होती. तसेच, पैसे देण्यास विलंब लावला या रागातून नातवाने आजीचा खून केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे.

हत्या झालेल्या आजी
हत्या झालेल्या आजी

By

Published : Dec 1, 2021, 8:54 AM IST

नागपूर - नागपुरमध्ये नातवानेच आजीचा खून केल्याची घटना घडली आहे. ( Grandmother killed by grandson ) नातवाला उच्च शिक्षणासाठी ( Higher education ) अमेरीकेला जायचे असल्याने त्याने पैशांची मागणी केली होती. त्यामध्ये आजी वारंवार नकारात्मक बोलत होती. तसेच, पैसे देण्यास विलंब लावला या रागातून नातवाने आजीचा खून केल्याची प्राथमीक माहिती समोर आली आहे. मितेश पाचभाई असे आजीचा खून करणाऱ्या नातवाचे नाव आहे. तर, देवका बोबडे असे मृतक आजीचे नाव आहे.

पत्रकार परिषद

का केला खून? (Nagpur Crime )

नंदनवन पोलीस स्टेशनच्या हद्दीत गायत्री कॉन्व्हेंटमध्ये टीबी रुग्णलयातून सेवा निवृत्त झालेल्या डॉक्टर देवका बोबडे या काही आजारामुळे अंथरुणाला खिळून होत्या. त्या जीथे राहत होत्या तिथेच त्यांची मुलगी, जावई, नातू राहत होते. मुलगी जावई हेसुद्धा पेशाने डॉक्टर आहेत. दरम्यान, त्यांचा मुलगा डिसेंबरमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरीकेला जाणार होता. त्यासाठी त्याला किमान 1 कोटीचा खर्च लागणार होता. यात 40 लाखाचे लोन मिळाले होते. पण आणखी इतर खर्च असल्याने त्याने आजीकडे पैसे मागितले होते. पण पैसे देण्यास आजी विलंब करत होती. तसेच, आजी काही नकारात्मक होलत होत्या. या रागातून नातवाने हा खून केला असल्याची माहिती समोर आली आहे.

हत्येच्या दिवशी काय घडले ( Crime Nwes )

दुपारी दोन वाजेच्या सुमारास टाकीतील पाणी संपल्याने नातू खाली आजीच्या घरात मोटर चालू करण्यासाठी गेला. यावेळी आजीने त्याला क्षुल्लक करणातून हटकले. त्यावेळी त्याने आजीला ढकलून दिले. पण आजीने त्याला प्रतिकार केला तेव्हा त्याचा आजीला खुर्चीवर बसवून त्याने हात बांधले. त्यानंतर गळा चिरून आजीचा खून केला असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा -New Chief Secretary : देबाशीष चक्रवर्ती राज्याचे नवीन मुख्य सचिव

ABOUT THE AUTHOR

...view details