नागपूर -राज्यपाल भगत सिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) नागपूर, अकोला आणि बुलडाणा जिल्ह्याच्या दोन दिवसीय दौ-यावर ( Two-Days Tour ) आले आहेत. त्यांचे सकाळी नागपूर विमानतळावर आगमन ( Arrived at Nagpur Airport )झाले. त्यानंतर लगेच ते अकोला येथील कार्यक्रमासाठी रवाना झालेत. विमानतळावर दाखल झाल्यानंतर त्यांच्या स्वागतासाठी अनेक नेते उपस्थित होते.
नितीन गडकरींकडून स्वागत -विमानतळावर त्यांचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विभागीय आयुक्त डॉ. माधवी खोडे-चवरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, जिल्हाधिकारी आर. विमला, महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी, नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, विशेष पोलीस महानिरिक्षक डॉ. छेरिंग दोरजे, सहपोलीस आयुक्त अश्वती दोरजे, पोलीस अधीक्षक विजय मगर यांनी स्वागत केले. यावेळी सर्वांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना गुलाब पुष्प दिले