महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वीज कनेक्शन कापणी थांबवा नाहीतर उद्रेक झाल्यास सरकार जबाबदार - माजी ऊर्जामंत्री बावनकुळे - Former Energy Minister Bavankule

राज्यात विद्युत कनेक्शन कापणीच्या मोहीमेला स्थगिती दिली नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला.

Former Energy Minister Bavankule
माजी ऊर्जामंत्री बावनकुळे

By

Published : Mar 16, 2021, 2:52 PM IST

Updated : Mar 16, 2021, 3:18 PM IST

नागपूर -राज्यात विद्युत कनेक्शन कापणीच्या मोहीमेला स्थगिती दिली नाही तर भाजप रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, असा इशारा माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला. तसेच कोरोनाच्या काळात वीज कनेक्शन कापणीच्या विरोधात उद्रेक झाल्यास या सगळ्याला मुख्यमंत्री आणि सरकार जबाबदार राहील, असेही ते म्हणाले.

प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत साधलेला संवाद

शेतकऱ्याचे कृषी पंप कापले जात आहेत. आर्थिक दुर्बल घटकांचे या कोरोनाच्या अडचणीत कापले जात आहे. कृषी धोरण जाहीर करून मार्च 2020 पर्यंत वीज कनेक्शन कापू नये असे लेखी आदेश काढले. एकीकडे धोरण जाहीर करत तेच दुसरीकडे शेतकऱ्याचे जुने बिल थकबाकी असल्याने वीज कनेक्शन कापले जात आहे.

हे गुंडांगर्दीचे धोरण

या पद्धतीचे धोरण राबवत महाविकास आघाडी सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरण्यास मजबूर करत आहे. लॉकडाऊन घोषित केले जात आहे. लोकांना घरात बंद करायचे, वीज कापायची हे सरकार गुंडा गर्दी पद्धतीने कारवाई करत आहे. असाही आरोप बावनकुळे यांनी केला आहे. या विरोधात उद्रेक होणार आहे. याला जवबादर मात्र सरकार असेल असेही माजी ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा -सचिन वाझेंनी परस्पर पुरावे लांबवले, पोलीस दप्तरी नाही नोंद

आयआयटी आणि वर्किंग गृपचा अहवाल सांगतो लाईन कापू नये

मागील काळात राज्यसरकारने आयआयटी मुंबईच्या माध्यमातून कृषिपंप वीज वापर सत्यशोधन समिती नियुक्त केली होती. याच्या अहवालानुसार योग्य ती दुरुस्ती केल्याशिवाय शेती पंप आणि ग्राहकांवर कारवाईत करता येणार नाही असे म्हटले असतांना जी कारवाई चुकीच्या पद्धतीने वीज कनेक्शन कापले जात आहे. तसेच वर्किंग ग्रुपच्याही अहवालात वीज वितरण गळती आहे. यामुळे देयक दुरुस्ती करणे आवश्यक आहे. त्याशिवाय कारवाई करणे बेकायदेशीर ठरेल असेही अहवालात म्हटले असल्याचे माजी ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी सांगितले.

ऑडिओ क्लिप काढणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा

एक ऑडिओ क्लिप वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांच्या विरोधात काढली जात आहे. ग्राहक अडचणीत असतांना निंदा नालस्ती केली जात आहे. कोरोनाच्या संकटात ग्राहकांची चेष्टा करणाऱ्या या ऑडिओ क्लिप काढणाऱ्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्याचीही मागणी केली आहे.

कोरोनाची त्या जिल्ह्यातील परिस्थिती पाहून आंदोलन करू

कोरोनाची परिस्थिती पाहता जेल भरो आंदोलन थांबवले. मुख्यमंत्री यांनी विनंती केली मान ठेवून आंदोलन मागे घेतले होते. पण सामान्य नागरिकांना अश्या पद्धतीने वेठीस धरले जाणार असेल तर आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरू असेही बावनकुळे म्हणाले. येत्या काळात वेग वेगळ्या जिल्ह्यातील परिस्थिती आढावा घेऊन आंदोलन करू असा इशारा दिला. तसेच आजच्या आज हा विद्युत पुरवठा खंडित करणे मोहिमेला थांबवले नाही तर भाजपा महाराष्ट्रभर रस्त्यावर येऊन नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी तयार आहे. गडचिरोली जिल्ह्यातील कोरपना गावाची वीज कापली जात आहे. ग्राहकांचे मीटर काढून नेले जात आहे. या कारवाईचा निषेध करत असल्याचे माजी ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले.

हेही वाचा -जामनेरमध्ये कोविडपेक्षा गैरसोई भयंकर, कोविड सेंटरमधून १५ रुग्ण पळाले

Last Updated : Mar 16, 2021, 3:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details