महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपूर: 'माझ्याकडे रागाने का पाहतो' म्हणत गुंडांनी दोन तरुणांना चाकूने भोसकले! - Kapil Nagar Nagpur crime news

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून बाबा ताजुद्दीन दर्गाजवळ आरोपी सलमान शेख याने विनय राबा त्याचा भाऊ आणि कुणाल वाघमारे यांना बोलाविले. यावेळी आरोपीने माझाकडे रागाने का पाहतो म्हणत त्या तरुणांवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही तरुण जखमी झाले आहेत

जखमी तरुण
जखमी तरुण

By

Published : Jun 7, 2021, 10:43 PM IST

Updated : Jun 8, 2021, 12:18 PM IST

नागपूर - माझ्याकडे रागाने का पाहतो एवढ्या क्षुल्लक कारणावरून दोन तरुणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना नागपूरच्या कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत म्हाडा कॉलनी परिसरात घडली आहे. ही घटना रविवारी संध्याकाळी साडेदहा वाजताच्या सुमारास घडली. विनय राबा आणि कुणाल वाघमारे अशी जखमी तरुणांची नावे आहेत.

गुंडांनी दोन तरुणांना चाकूने भोसकले

दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादातून बाबा ताजुद्दीन दर्गाजवळ आरोपी सलमान शेख याने विनय राबा त्याचा भाऊ आणि कुणाल वाघमारे यांना बोलाविले. यावेळी आरोपीने माझाकडे रागाने का पाहतो म्हणत त्या तरुणांवर हल्ला केला. या घटनेत दोन्ही तरुण जखमी झाले आहेत. या घटनेचा विडिओ व्हायरल झाल्याने हा गुन्हा उघडकीस आला आहे.

हेही वाचा-स्पीड पोस्टद्वारे पाठवा विसर्जनासाठी अस्थी; वेबकास्टद्वारे पाहा श्राद्ध संस्कार


7 जणांनी पोटात मारला चाकू
विनय आणि कुणाल हे दोघेही कपिल नगर पोलीस स्टेशन अंतर्गत रहिवासी आहेत. यात कुणाल वाघमारे सोबत त्याच परिसरात राहणाऱ्या सलमान शेख याने माझाकडे गुरकावून का पाहतो या कारणाने वाद केला. यानंतर हा वाद निवळला. पण रविवारी रात्री साडे 10 वाजताच्या सुमारास कुणाल वाघमारे याला आरोपीने बोलाविले. यावेळी त्याचसोबत विनय राबा आणि त्याचा भाऊसुद्धा सोबत होता. यावेळी सलमान शेख, शमशेर शेख यांच्यासोबत असलेल्या 7 जणांनी कुणाला वाघमारेला पाठीत तर विनय राबला पोटात चाकु मारला. यात कल्पेश राबाहा सुद्धा किरकोळ जखमी झाला होता.


हेही वाचा -मराठा आरक्षणासह विविध मुद्यांवर मुख्यमंत्री पंतप्रधान मोदींची घेणार भेट - वळसे पाटील


तरुणाचा व्हिडिओ शहरात झपाट्याने व्हायरल
विशेष म्हणजे या हल्ल्यानंतर दोघेही त्यांच्या पोटात आणि पाठीत चाकू खुपसलेल्या आणि रक्तबंबाळ अवस्थेत कपिलनगर पोलीस स्टेशनला पोहोचले. यावेळी विनय राबाच्या पोटात तर कुणाला वाघमारेच्या पाठीत चाकु खुपसलेला होता. यावेळी कपिल नगर पोलिसांनी त्यांना उपचारासाठी पोलीस वाहनात मेयो रुग्णलयाय नेले. पोटात मारलेला चाकू घेतलेल्या तरुणाचा व्हिडिओ शहरात झपाट्याने व्हायरल झाला आहे.

तरुणांवर उपचार सुरू-
पोलिसांनी या घटनेसंदर्भात म्हाडा कॉलनी परिसरातला गुंड सलमान शेख याच्यासह त्याच्या काही सहकाऱ्यांना अटक केली आहे. गंभीर जखमी झालेल्या विनय आणि कुणाल यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

Last Updated : Jun 8, 2021, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details