नागपूर- राज्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होत आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल रात्री ८ वाजल्यापासून कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लावला आहे. आजच्या स्थितीत उपराजधानी नागपुरातील कोरोनाची परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊनची अंमलबजावणी अत्यंत प्रभावीपणे केली जात असल्याची माहिती शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे. याकाळात विनाकारण रस्त्यांवर फिरणाऱ्या बेजबाबदार नागरिकांवर कारवाई केली जाणार असल्याचीही माहिती त्यांनी दिली आहे.
लॉकडाऊनला नागपुरकरांचा चांगला प्रतिसाद - Amitesh Kumar Commissioner of Police, Nagpur City
'ब्रेक द चेन' अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात बुधवारी रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर पोलिसांनी नियम तोडणाऱ्यांवर कारवाई करायला सुरुवात केली आहे. लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी नागपूरकरांनी चांगला प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळत आहे.
पोलिस आयुक्त अमितेशकुमार