नागपूर -नागपुरात लॉकडाऊनचा चौथा दिवस आहे. आजच्या दिवसाची सुरुवात पावसाने झाली. दिवसभराची परिस्थितीचा आढावा सायंकाळी घेतला असता नागरिकांनी लॉकडाऊनला प्रतिसाद दिल्याचे चित्र दिसून आले. तेच वाहतूक पोलिसांनासुद्धा तसा अनुभव आल्याचे त्यांनी सांगितले आहे. पण हा नागपूरकरांचा समजूतदारपणा, ढगाळ वातावरण की बुधवारी पॉझिटिव्ह रुग्णसंख्या उद्रेकाचा परिणाम? हा प्रश्नच आहे. पण वाढती रुग्णसंख्या पाहता दिवसभरात गर्दी रस्त्यावरून ओसरलेली दिसून आली.
नागपुरात बुधवारी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळाला. जवळपास 3 हजार चारशेच्या घरात कोरोनाबाधित रुग्ण पॉझिटिव्ह मिळून आले. यामुळे कोरोनाचे संसर्ग वाढताना दिसून येत आहेत. विशेष म्हणजे मागील वर्षात कोरोनाचा उद्रेक असताना यात आताच्या घडीला मिळणारी रुग्णसंख्या अधिक आहे. असे असले तरी त्यात रुग्णांची प्रकृती गंभीर होण्याचे प्रमाण घटले आहे.
हेही वाचा -कराटे चॅम्पियन हेमंत नगराळे भावावरच करायचे प्रात्यक्षिके, कुटुंबीयांनी सांगितल्या आठवणी
कोविड केअर सेंटर सुरू करण्याच्या तय्यारीत
नागपुरात आरोग्य यंत्रणेवर ताण वाढताना दिसून येत आहे. यासोबत रुग्णसंख्या अधिक असल्याने घरात राहून विलगीकरण पाळण्यास अडचणी येत आहेत. परिणामी घरातल्या घरात रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. यामुळे नागरिकांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यासाठीची व्यवस्था करण्याचा विचार प्रशासन करत आहे. यात प्रशासन व्हिएनआयटी आणि पाचपावली या सेंटरसह अन्य सेंटर सुरू करून घरातून होत असलेल्या कोरोनाच्या संसर्गावर मात करण्याचा प्रयत्न करत आहे.