महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Arvind Kejriwal : 'शाळा, कॉलेज देणारा पक्ष पाहिजे की दंगे घडवणारा'; केजरीवालांचा भाजपवर निशाणा - अरविंद केजरीवाल भाजप मराठी बातमी

एक पार्टी दंगे घडवणाऱ्या सोबत घेऊन सत्कार करते. तुम्ही ठरवा तुम्हाला शाळा कॉलेज देणारा पक्ष पाहिजे की दंगे घडवणारा, असा अप्रत्यक्षरित्या निशाणा केजरीवाल यांनी भाजपवर साधला आहे. ते नागपूरात एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत ( Arvind Kejrival Criticized Bjp ) होते.

Arvind Kejriwal
Arvind Kejriwal

By

Published : May 8, 2022, 7:34 PM IST

नागपूर - देशात होणाऱ्या 2024 च्या निवडणुका आमचे लक्ष नाही. तर, आमचा देश एक नंबर बनवणे आमचे लक्ष आहे. आम्ही राजकारण करून सत्ता स्थापन करण्यासाठी नाही, तर देश घडवण्यासाठी आलो असल्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.तसेच, 10 पक्षांच्या आघाडी सोबत जायचे नसून, 130 करोडी जनसोबत आघाडी करायची आहे. एक पार्टी दंगे घडवणाऱ्या सोबत घेऊन सत्कार करते. तुम्ही ठरवा तुम्हाला शाळा कॉलेज देणारा पक्ष पाहिजे की दंगे घडवणारा, असा अप्रत्यक्षरित्या निशाणा केजरीवाल यांनी भाजपवर साधला आहे. ते नागपूरात एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलत ( Arvind Kejrival Criticized Bjp ) होते.

अरविंद केजरीवाल म्हणाले की, अनेक पक्ष सोयी सुविधा फ्री देत असल्याने टीका करतात. पण, लोकांना मोफत शिक्षण देत आहे. लोकांना मोफत आरोग्य सेवा देत आहे. कारण खाजगी दवाखाने किंवा शाळेच्या संस्थेसोबत साटलोट नाही. लोकांना मोफत देतो, तर यात काय चूक आहे, असा सवालही केजरीवाल यांनी उपस्थित केला आहे.

"तुम्ही ठरवा कोणासोबत जायचे" -देशात दंगा झाल्यावर गुडांना स्वत:च्या पक्षात घेऊन त्यांची शोभायात्रा काढली जाते. ज्यांना दंगे करणाऱ्या पक्षासोबत जायचे आहे, त्यांनी जावे. पण, ज्यांना शाळा, कॉलेज, आरोग्य सुविधा पाहिजे त्यांनी माझ्यासोबत यावे, असा अप्रत्यक्ष निशाणा केजरीवालांनी भाजपवर साधला आहे.

"सरकारी शाळेतील मुले आयआयटीत प्रवेश घेतात" - मी फ्री सुविधा देतो यात गैर काय आहे. लोकांना मोफत सोयी सुविधा देताना पूर्ण भ्रष्टाचार बंद केला. त्यामुळे तो पैसा जनतेच्या सेवेत जनतेला सोयी सुविधा देण्यासाठी वाटप करत आहे. आज दरवर्षी गरीब घरातील 450 मुलांना आयआयटी मध्ये प्रवेश मिळू लागला आहे, असेही केजरीवालांनी सांगितले आहे.

"पंजाबमधील भ्रष्टाचार दूर करण्यासाठी योजना" -भ्रष्टाचाराबात बोलताना पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यावेळी म्हणाले की, जर कोणी सरकारी कार्यालयात कामासाठी पैसे मागत असेल, तर त्यांना नाही म्हणून नका. एका खिशातून पैसे काढा दुसऱ्या खिश्यातून मोबाईलमध्ये व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा. यामुळे मोठा बदल पाहायला मिळाला. अनेक ठिकानी 'रिश्वत लेना पाप है' असे बोर्ड लागले, असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

"50 दिवसांत 26 हजार जणांना नोकरीची घोषणा" -पंजाबमध्ये मोठे यश मिळाल्याने जबाबदारी वाढली आहे. आमचे राजकारण हे सेवेचे काम असल्याने यासाठी वेगळी पेंशन न देता एक आमदार एक पेंशन योजना सुरू केली. पंजाबमध्ये सरकार येताच 50 दिवसांत 26 हजार 454 लोकांच्या नोकरीचे नोटिफिकेशन काढले. ते ही भ्रष्टाचार न करता कोणत्याही शिफारशी शिवाय सरकारी नोकरी दिल्या आहेत. मेरा भारत महान ट्रक मागे लिहून होणार नाही, त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे, असेही भगवान मान म्हणाले.

हेही वाचा -Shivsena Rally Teaser : 'खऱ्या हिंदुत्वाचा हुंकार ऐकायला यायलाच पाहिजे'; मनसेपाठोपाठ शिवसेनेचा 'धडाकेबाज' टीझर लॉन्च

ABOUT THE AUTHOR

...view details