महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मित्रानेच केला घात; उपराजधानीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, चौघांना अटक, तीन फरार

अल्पवयीन मुलीचा मित्रानेच पैसे घेऊन काही मुलांना बोलावले आणि मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार नागपुरात घडला आहे. याप्रकरणी चार जणांना अटक केली असून आणखी तीन जणांचा शोध सुरू आहे.

gang-raped on minor girl in nagpur
उपराजधानी हादरली : अल्पवयीन मुलीच्या मित्रानेच केला घात, मित्रांकडून पैसे घेऊन केला सामूहिक बलात्कार

By

Published : Oct 8, 2021, 9:27 PM IST

नागपूर - उपराजधीनीत मैत्रीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. अल्पवयीन मुलीच्या मित्राने आपल्या मित्रांकडून पैसे घेऊन मैत्रिणीवर सामूहिक बलात्कार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत इसासनी मिहान मार्गावर नराधमांनी तिच्यावर अत्याचार केला. गुरुवारी उशिरा रात्री पीडितेचा तक्रारीवरून ही घटना समोर आली. यात सात आरोपी असून चौघांना अटक करण्यात आली असून तिघांचा शोध सुरू आहे, अशी माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली आहे.

अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची प्रतिक्रिया

तरुणीशी संपर्ककरुन देण्यासाठी घेतले पैसे -

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन पीडित मुलगी ही त्याच भागात राहणाऱ्या मित्रासोबत इसासनी मिहान मार्गावर एका ठिकाणी बसून होते. तिथे त्या ठिकाणी अज्ञात तिघांनी यावेळी तिच्या मित्राला मारहाण करून तिघांनी तिच्यावर अतिप्रसंग केल्याची तक्रार पीडित युवतीने एमआयडीसी पोलिसात केली. चौकशीदरम्यान त्या अल्पवयीन मुलीचा मित्रानेच पैसे घेऊन काही मुलांना बोलावले असल्याचे पुढे आले आहे. आकाश भंडारी असे त्या मित्राचे नाव आहे. यात मागील तीन दिवसात मित्राने काही मुलांकडून पैसे घेऊन त्यांना बोलावले आणि पीडित तरुणीशी शारीरिक संबंध ठेवण्याच्या बदल्यात पैसे घेतले. पीडितेचा मित्रासह चौघांना पोलिसांच्या अटक केली आहे. पीडीतेवर अत्याचार करणाऱ्या अजून तिन्ही अज्ञातांचा शोध सुरू आहे.

विविध कलमान्वये गुन्हा दाखल -

यामध्ये पीडित तरुणीचे वैद्यकीय चाचणी करण्यात आली असून प्रकृती ठीक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. यात मुलीच्या मित्राने काही पैसे घेऊन त्या मुलीशी शारीरिक संबंध करण्यास उद्युक्त केल्याने पिटा अंतर्गत सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. या संदर्भात अतिरिक्त पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी तसेच पोलीस उपायुक्त नरूल हसन यानी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन स्वतः लक्ष घालून आहे. यात एमआयडीसीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमेश बेसरकर यांच्या नेतृत्वात पोलीस चमू अत्याचार करणाऱ्या तिघांचा शोध घेत आहे.

हेही वाचा -अफगाणिस्तानात मशिदीवर आत्मघाती बॉम्बहल्ला; 100 ठार!

ABOUT THE AUTHOR

...view details