महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

नागपुरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद - Nagpur police

पोलीस गस्तीवर असताना शनिवारी रात्री त्यांना दरोडेखोरांची टोळी रेल्वे लाईन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना आढळली. त्यानंतर पोलिसांनी या टोळीला अटक केली.

नागपुरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

By

Published : Aug 4, 2019, 5:59 PM IST

नागपूर - शहरातील कोलकाता रेल्वे लाईन परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या ५ जणांच्या टोळीला पाचपावली पोलिसांनी जेरबंद केले आहे. शनिवारी मध्य रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

नागपुरात दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

पोलीस गस्तीवर असताना शनिवारी रात्री त्यांना ही टोळी संशयास्पद हालचाली करताना आढळली. त्यानंतर पोलीस टोळीतील व्यक्तींच्या जवळ गेले असता तेथून त्या लोकांनी पळ काढला. पण पोलिसांनी मोठ्या शिताफीने या आरोपींना पकडले. त्याच्याकडून २ तलवारी, १ गुप्ती, १ चाकू आणि नायलॉनची दोरी, अशा प्राणघातक वस्तू जप्त करण्यात आल्या आहेत.

ताब्यात घेतल्या टोळीतील प्रत्येकावर गुन्हे दाखल असून ते सर्राइत गुन्हेगार आहेत अक्षय राजुरकर याच्या वर ४ गुन्हे, अभिषेक उर्फ भांज्या गुलाबे याच्यावर ५, अभिशेक मंगेश गिरी याच्यावर ७ तर विक्की वाघाडे याच्या वर १ गुन्हा दाखल आहे. हे चारही आरोपी १९ वर्षाचे आहेत. तर २० वर्षीय वक्की पराते याच्यावर २ गुन्हे दाखल आहेत. आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास पाचपावली पोलीस करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details