महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ganeshotsav 2022 नागपूरात सकाळच्या आरतीने टेकडी गणेशउत्सवाला सुरुवात, जाणून घ्या मंदिराचा इतिहास - सकाळच्या आरतीने टेकडी गणेशउत्सवाला सुरुवात

आजपासून गणेशोत्सवाच्या उत्सवाला Ganeshotsav 2022 सुरुवात झाली आहे. नागपूर तेसचं विदर्भ, मध्यप्रदेश आणि शेजारच्या राज्यातील लाखो-कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिरात Tekadi Ganesh Temple सकाळच्या आरती पासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी भक्तगण पहिल्या आरतीसाठी उपस्थित होते.

Tekadi Ganesh
टेकडी गणेश

By

Published : Aug 31, 2022, 10:27 AM IST

नागपूर -आजपासून गणेशोत्सवाच्या उत्सवाला सुरुवात Ganeshotsav 2022 झाली आहे. नागपूर तेसचं विदर्भ, मध्यप्रदेश आणि शेजारच्या राज्यातील लाखो-कोट्यवधी भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणपती मंदिरात सकाळच्या आरती पासून उत्सवाला सुरुवात झाली आहे. यावेळी भक्तगण पहिल्या आरतीसाठी उपस्थित होते. यानिमित्ताने टेकडी गणेश मंदिराची Tekadi Ganesh Temple ओळख करून घेणार आहोत. दोन वर्षानंतर गणेशोत्सव सार्वजनिकरित्या साजरा होतो आहे, त्यानिमित्ताने नागपूरच्या प्रसिद्ध टेकडी गणेश मंदिरात विशेष तयारी करण्यात आली आहे. नागपूरचं नव्हे तर विदर्भ आणि मध्य भारतातील नागरिकांच्या आस्थेचं श्रद्धास्थान असलेल्या टेकडी गणेश मंदिरात भाविकांची मांदियाळी आपल्याला वर्षभर बघायला मिळते. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून देखील टेकडी गणेश प्रसिद्ध आहे.



टेकडी मंदिराचा इतिहास :आपल्या देशात इंग्रजांची सत्ता होती. तेव्हा राजे भोसले आणि इंग्रजांची लढाई सीताबर्डी परिसरातील टेकडीवर झाली होती, असा इतिहास आहे. त्याच टेकडीवर गणेश मंदिर आहे. त्या काळी शुक्रवारी तलावाचे पाणी टेकडी मंदिरापर्यंत येत असल्याने भोसले राजे नावेतून गणेश मंदिरात दर्शनासाठी येत असल्याची माहिती आहे. गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात हे विनायकाचं मंदिर अगदी छोटासे होते. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड असून शेंदराच्या लेपामुळे आता ते स्पष्टपणे दिसत नाही.

नागपूरात सकाळच्या आरतीने टेकडी गणेशउत्सवाला सुरुवात



पिंपळाच्या झाडाखाली बाप्पा स्थानापन्न :गणपती बाप्पाची मूर्ती पिंपळाच्या झाडाखाली स्थानापन्न आहे. सुरुवातीच्या काळात विनायकाचं मंदिर अगदी छोटासे होते. त्यानंतर हळूहळू टेकडी गणेश मंदिराचा विकास झाला. मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार आहे, मात्र बाप्पाची मूर्ती उत्तराभिमुख आहे, तर मूर्ती उजव्या सोंडेची आहे. गणपती मूर्तीच्या मागच्या भिंतीजवळ एक शिवलिंग आहे. बापाच्या मूर्तीची उंची साडेचार फूट तर रुंदी तीन फूट आहे. मूर्तीला दोन पाय, चार हात, डोकं आणि सोंड असून शेंदराच्या लेपामुळे आता ते स्पष्टपणे दिसत नाही.

हेही वाचाGanesh Chaturthi 2022 गणेश मूर्तीची स्थापना करण्याचा हाच शुभ मुहूर्त आणि मार्ग, जाणून घ्या गणेश चतुर्थीची सुरुवात कशी झाली

ABOUT THE AUTHOR

...view details