महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोनामुळे बदलले केंद्रीय मंत्री नितीन गडकरीचे न्यु नॉर्मल जग.... - रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी

कोरोनामुळे नवीन आव्हाने आले आहेत. सामाजिक अंतर ठेवत नवीन माध्यमातून हजारो लोकापर्यंत पोहचण्याचे नवे पर्याय पुढे आले आहेत. राजकीय क्षेत्रातील मंडळी आता या सोशल मीडियाद्वारे पुढे येत आहेत. हे लोकांमध्ये जाऊन गर्दी करत नसले तरी, नियम पाळून फॉलोवरर्सची गर्दी नक्कीच करतांना दिसून येत आहे.

रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी
रस्ते परिवहन मंत्री नितीन गडकरी

By

Published : May 20, 2021, 1:09 PM IST

Updated : May 20, 2021, 3:05 PM IST

नागपूर- कोरोनामुळे अनेकांचे जग बदलून गेले आहे. फक्त सामान्य माणसाचेच जीवन बदलले नाही तर देशाच्या राजकारणातले रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्याही आयुष्यात काही महत्वाचे बदल घडल्याचे ते सांगत आहेत. टेक्नॉलॉजी पासून दूर असणारे गडकरी आज टेक्नोसॅव्ही झाले असल्याचे ते सांगत आहेत. केंद्रीय मंत्री गडकरी सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. कोविडमुळे त्यांनी दोन गोष्टी स्वीकारल्या असल्याचे, स्वदेशी जागरण मंचाकडून आयोजीत व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये ते सांगत होते. या कॉन्फरन्समध्ये भारतातील अनेक विद्यापीठांचे कुलगुरु व केंद्रीय रसायन खतमंत्री मनसुख मांडवीय उपस्थित होते.

कोरोनामुळे बदलले गडकरींचे जग

कोरोनाच्या संकटाने जीवनात दोन महत्वाचे बदल घडलेत

या काळात त्यांनी सकाळ आणि संध्याकाळ या दोन्ही वेळेस व्यायाम करायला सुरुवात केल्याचे आवर्जून सांगतात. यात कोविडमध्ये व्यायाम करण्याचा व्हिडिओ त्यांनी युट्युबवर टाकला आहे. ज्याला 3 लाख 14 हजार लोकांनी पाहिला आहे. यासोबत या कोरोनाच्या काळात गीतेचा दहावा अध्याय युट्युबरवरून ऐकल्याची संधी मीळाली असल्याचेही ते सांगतात. यासोबत अनेकदा गाणे ऐकत असल्याचेही त्यांनी सांगितले. पण याच काळात कोरोनामुळे महत्वाचा झालेला बदल म्हणजे त्यांनी देश आणि परदेशातील कॉन्फरसनला ऑनलाईन पद्धतीचा अवलंब करत सहभाग घेतला. त्यांनी गेल्या काही दिवसांमध्ये 900 पेक्षा जास्त कॉन्फरस युट्युब, फेसबुक आणि ट्विटर हँडलच्या माध्यमातून शेअर केल्या आहे. ज्यांना लाखो लोकांची पसंती मिळू लागली आहे. हा मोठा बदल घडल्याचे ते सांगतात.

नवीन माध्यमातून सहभागाला पसंती

या काळात आलेल्या संकटामुळे जिथे बाहेर पडता येत नव्हते, तिथे अनेक ठिकाणी आभासी पद्धतीने उपस्थिती लावणे, उद्घाटन, लोकार्पण, यासारख्या कार्यक्रमांना सहभागी होऊन त्यांनी बदलाचे संकेत दिले आहेत. तसेच त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत समजदारीचे डोसही दिले आहेत. यामुळे त्यांच्या व्हिडिओला सोशल माध्यमातून पसंती मिळाली आहे. दररोज लाखो लोक त्यांच्या सोशल मीडियावर जाऊन त्यांना ऐकण्याचे काम करतात.

काही भाषणे अधिकच गाजले; विरोधकांनी केले कौतुक

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे अनेक भाषण यापूर्वीही चर्चिले जात होते. यात नुकत्याच झालेल्या कार्यकर्त्यांच्या संवादात कोरोनापासून काळजी घेण्याचा सल्ला देणारे भाषण प्रचंड व्हायरल झाले. ज्यामुळे काहींनी चिमटे काढले, तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

सोशल मीडियातून मिळणारे उत्पन्न कोरोना मदतीवर खर्च

फेबसुकवर 14 लाख 63 हजार, 520 जण फॉलोअर्सवर, तेच ऑफिशियल नावाने असलेल्या पेजला 2 लाख 9 हजार 188 जण जोडले आहे. यात युट्युबर 1 कोटी 79 हजार 913 लोकांनी त्याचे व्हिडिओ पाहिले आहे. ट्विटरवर नितीन गडकरी यांचे 86 लाख फॉलोअर्स आहे. तेच नितीन गडकरी ऑफिशियल नामक हँडलवर 1 लाख 39 हजार चारशे लोक त्यांना फॉलो करत आहे. यामाध्यमातून युट्युबवरून आता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महिन्याला 4 लाख रुपये मिळत आहेत. हे पैसे त्यांनी कोरोना मदतीवर खर्च केल्याचेही ते सांगत आहे.

हेही वाचा -राजीव सातव यांच्या निधनानं कुटुंबीयांसह काँग्रेसवर मोठा आघात, राहुल गांधीनी आठवणी जाग्या करत वाहिली श्रद्धांजली

Last Updated : May 20, 2021, 3:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details