महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Nitin Gadkari नितीन गडकरी संतापले! म्हणाले, हे थांबवले नाही तर कोर्टात जाणार - Gadkari is furious

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका पाठोपाठ एक तीन ट्विट केले आहेत, ज्यामध्ये त्यांनी आपल्या विधानांचा विपर्यास केला जात असल्याचे म्हटले आह. Gadkari is furious त्याचबरोबर त्यामध्ये अत्यंत खोटारडेपणा दाखवला जातं असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियाचा एक विशिष्ट वर्ग हे सर्व राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

नितीन गडकरी
नितीन गडकरी

By

Published : Aug 25, 2022, 3:50 PM IST

Updated : Aug 25, 2022, 3:55 PM IST

नागपूर - भारतीय जनता पक्षाचे नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे आज मीडियावर चांगलेच संतापले असल्याचे बघायला मिळाले. नितीन गडकरी यांचे प्रत्येक वक्तव्य पक्षाच्या संसदीय मंडळातून वगळण्यात आल्याच्या घटनेशी जोडून दाखवले जात असल्याने त्यांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे चित्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आज गुरुवार दि. 25 ऑगस्ट रोजी थेट प्रसारमाध्यमांवर हल्लाबोल केला आहे. Nitin Gadkari lashed out at the media हे सर्व राजकीय फायद्यासाठी केले जात आहे. मी सार्वजनिक कार्यक्रमात सांगितलेल्या गोष्टी चुकीच्या संदर्भात मांडल्या जात आहेत असे त्यांनी ट्विट करून सांगितले आहे. त्यांनी ट्विटवर दिल्लीत झालेल्या कार्यक्रमाची व्हिडीओ लिंकही शेअर केली आहे.

नितीन गडकरी यांचे ट्विट

सोशल मीडियाचा एक विशिष्ट वर्ग हे करत आहे नितीन गडकरी यांनी एका पाठोपाठ तीन ट्विट केले, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या विधानांचा विपर्यास केला जातो आहे. त्याचबरोबर अत्यंत खोटारडेपणा दाखवला जातं असल्याचा आरोप केला आहे. Why was Nitin Gadkari angry with the media मुख्य प्रवाहातील माध्यमे आणि सोशल मीडियाचा एक विशिष्ट वर्ग हे सर्व राजकीय फायद्यासाठी करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये मी बोललेल्या गोष्टी चुकीच्या प्रकारे दाखवल्या जात असल्याचे ते म्हणाले आहेत. दरम्यान, हे असेच चालू राहिले तर आपण या संदर्भात न्यायालयात जाणार आहोत असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.

नितीन गडकरी यांचे ट्विट

काय आहे नेमकं प्रकरणमाजी अधिकारी आणि लेखक ज्ञानेश्वर मुळे यांच्या नौकरस्याही के रंग या पुस्तकाच्या लोकार्पण प्रसंगी नितीन गडकरी यांनी १९९७ साली घडलेल्या घटनांच्या आठवणींना उजाळा दिला. त्यांनी अमरावतीच्या मेळघाट येथे कुपोषणामुळे अडीच हजार बालकांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नितीन गडकरी यांना प्रशासकीय अनास्था अनुभवायला मिळाली होती. वन कायद्यामुळे शेकडो गावात रस्तेचे तयार होऊ शकले नाही. त्यामुळे कोणत्याही सुविधा पुरवणे शक्य होते नव्हते. त्यावेळी मला राहावले नाही म्हणून मी मेळघाटात रस्ते तयार करण्याची जबाबदारी घेतली.

नितीन गडकरी यांचे ट्विट

नाराजी व्यक्त केली मी तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना सांगितले की हे प्रकरण आता माझ्यावर सोडा, काय परिणाम होतील याची मला चिंता नाही, पण मी हे काम करणारच. तेव्हा मी अधिकाऱ्याला देखील सांगितलं. तुम्हाला शक्य झालं तर माझ्या पाठीशी उभे राहा, नाही राहिलात तरी हरकत नाही. मंत्रीपद गेले तरी चालेल पण हे काम पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही आणि अखेर मी ४५० गावांमध्ये रोड तयार केले अशी आठवण गडकरींनी सांगितली. मात्र, त्यावेळी केलेले वक्तव्य सध्याच्या राजकीय परिस्थिती सोबत जोडले जात असल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -Delhi Politics सीएम केजरीवाल यांची आप आमदारांसोबतची बैठक संपली, ६१ पैकी ५२ आमदार राहिले हजर

Last Updated : Aug 25, 2022, 3:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details