नागपूर -नागपूर मध्यवर्ती कारागृहात ( Nagpur Central Jail ) एका कैद्याने दुसऱ्या कैद्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना उघडकीस आली आहे. मुंबई बॉम्ब स्फोटातील कैदी नावेद हुसेन विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे मध्यवर्ती कारागृहात खळबळ उडाली आहे.
मध्यस्थीमुळे दुर्घटना टळली -नावेद हुसेन खान उर्फ रशीद हुसेन खान हा २०१५ पासून नागपूरच्या कारागृहात कैद आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांचे मकोकाचा कैदी जुल्फिकार जब्बार गणीसोबत वाद झाला होता. काल आरोपी नावेद याने संधी मिळताच जुल्फिकारवर हल्ला केला. अचानक झालेल्या हल्यामुळे जुल्फिकारला सावध होण्याची संधी मिळाली नाही. यार्ड मधील इतर कैद्यांनी वेळीस धाव घेतल्याने दुर्घटना टळली आहे.