नाशिक-नाशिक शहरात गेल्या दोन दिवसांपासून बिबट्याचा मुक्त संचार ( Free movement of leopard in Nashik city ) सुरू असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( Fear among citizens ) पसरले आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीतील निलकमल मार्बलच्या परिसरात बिबट्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांमध्ये घबराट ( Panic among employees ) निर्माण झाली आहे. वन विभागाने बिबट्याला जेरबंद ( Demand for seizure of leopard ) करावे अशी मागणी नागरीकांनी केला आहे.
नाशिक शहरात बिबट्याचा मुक्त संचार सुरू -दोन दिवसापूर्वी लवाटे नगर परिसरात बिबट्याचे एका प्रवाशाला दर्शन झाला होते. यावेळ त्यांनी बिबट्याचे मोबाईलमध्ये चित्रीकरण करून हा व्हिडिओ वन खात्याला पाठवला होता. त्यानंतर वन खात्याने या परिसरात कसून शोध घेतला मात्र, बिबट्या आढळून आला नाही. अशात दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील नीलकमल मार्बल्स परिसरात दिसून आला आहे. यामुळे आता कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावे अशी मागणी कामगार वर्गाने केली आहे.