नागपूर -माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या महाराष्ट्र कन्या असून विदर्भाच्या सून आहे. सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. याच निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने त्यांचा नागरिक सत्कार घेण्याचे ठरले आहे. 19 डिसेंबरला त्या वयाच्या 85 वर्ष पूर्ण करणार आहे. हा सत्कार राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रपती असताना नागपूरात न होऊ शकलेला त्यांचा सत्कार, आता होणार आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माजी राष्ट्रपती असताना का होईना नागपुरात राहून गेलेला सत्कार होणार आहे, असे अनिल देशमुख यांनी सांगितले.
राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया हेही वाचा... आघाडी सरकारचं अखेर ठरलं; 'या' तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
प्रतिभाताई पाटील राष्ट्रपती असताना अशाच प्रकारे सत्काराचे नियोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राच्या कन्या देशाच्या सर्वोच्च पद असलेल्या प्रथम नागरिकपदी विराजमान होणे ही अभिमानाची बाब होती. पण प्रत्यक्षात व्यस्त कार्यक्रम आणि तारखेचा मुहूर्त यातच सर्व अडकून राहिले. पण वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला त्यांचा नागरी सत्काराचा मुहूर्त निघाला आहे. नागपुरातील देशपांडे सभागृहात 18 डिसेंबरला हा नागरी सत्कार पार पडणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी सांगितले.
हेही वाचा... इथं ओरडण्यापेक्षा केंद्रात जाऊन ओरडा, उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या हस्ते हा सत्कार होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला हजेरी लावणार आहे. यावेळी हा राजकीय कार्यक्रम नसला तरी यात तीनही पक्षाचे लोकांनी एकत्र येत कार्यक्रमाची आखणी केली आहे. विशेष म्हणजे यात भाजपचे नेते मंडळींना, आमदार यांना सुद्धा कार्यक्रमाचे आमंत्रण दिले असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.