नागपूर - मिठाईवर पिस्ता (Pista) टाकून ती मिठाई स्वस्तात विकत असाल तर ते आपण लगेच घेण्याचा विचार करतो. मात्र, थांबा... मिठाईवर टाकलेला तो हिरवा पिस्ता नसून, तो शेंगदाण्याचा काप आहे. शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन तो मिठाईवर टाकला जात असल्याचा प्रकार नागपुरात समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने (Food and Drug Department) केलेल्या कारवाईतून ही बाब समोर आली आहे. नागपूरच्या शांतीनगर भागात एका कारवाईत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या कारवाईत 621 किलो रंगवलेल्या शेंगदाण्याचा साठा जप्त केला आहे.
नागपूरच्या शांतीनगर परिसरात काशी शेंगदाणा चिप्सच्या नावाने कारखाना आहे. यामध्ये अशा पद्धतीने ग्राहकांची फसवणूक करण्यासाठी शेंगदाण्याला हिरवा रंग देऊन तो वाळवला जातो. त्यानंतर त्या शेंगदाण्याचा काप तयार करून पॅकेट तयार केले जात होते. हे पॅकेट मिठाई बनवणाऱ्या दुकानदारांना विकले जातात. गुप्त माहितीच्या आधारे अन्न व प्रशासन अधिकारी विनोद धवड यांनी कारखान्यात जाऊन ही कारवाई केली. त्यामध्ये रंग लावून अशा पद्धतीने शेंगदाण्याचे काप करणे अन्न व प्रशासन विभागाच्या कायद्यान्वे गुन्हा असल्याने कारवाई करत हा साठा जप्त केला आहे. याच शेंगदाण्याचे नमुने घेऊन प्रयोगशाळेत पाठवले जाईल. अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करत प्रकरण न्यायालयात दाखल केले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.
नागपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सोनपापडी बनवण्याचा व्यवसाय आहे. शहरात अनेक असे छोटे-छोटे कारखाने असून, याच सोनपापडीवर टाकण्यासाठी स्वस्त शेंगदाण्याच्या कापचा उपयोग केला जात असल्याची धक्कादायक बाब अन्न व प्रशासन विभागाच्या कारवाईतून समोर आली आहे. मिठाईमध्येसुद्धा सजावट करण्यासाठी काप टाकून मिठाईवर होणारा खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पण ग्राहकांच्या जीवाशी हा खेळ असून फसवणूक असल्याचीही बाब यामध्ये समोर आली आहे.
- कसा चालतो हा व्यवसाय?