महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

New Year Celebration 2022 : नववर्ष जल्लोषाचा उन्माद पडणार महागात.. तर नवीन वर्षाची पहिली रात्र काढावी लागेल तरुंगात ! - New Year Celebration 2022

यंदाच्या नवर्षाचा जल्लोष पार्ट्यांवर (New Year Celebration 2022 )ओमायक्रॉनचे संकट घोंगावत आहे. मागील काही दिवसात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे राज्य सरकारबरोबरच नागपूर पोलिसांकडून नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांवर व लोकांच्या एकत्र येऊन जल्लोष करण्यावर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध डावलून नववर्ष स्वागताच्या पार्ट्या आयोजित केल्यास कडक कारवाईचा इशारा नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिला आहे. यासाठी शहरात अडीच लाख पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

New Year Celebration
New Year Celebration

By

Published : Dec 31, 2021, 12:17 PM IST

Updated : Dec 31, 2021, 3:58 PM IST

नागपूर - ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर नववर्षाचा जल्लोष (New Year Celebration 2022) आणि उन्माद महागात पडण्याची शक्यता आहे. कारण नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार (Nagpur Police Commissioner Amitesh Kumar) यांनी कुठेही असा प्रकार उघडकीस आल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. राज्यसरकार आणि जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीनुसार नववर्ष स्वागताच्या पार्ट्यांवर बंदी घातली आहे. त्यामुळे नियमांना डावलून कोणी जल्लोष करत असेल तर नववर्षाची रात्र पोलीस स्टेशनमध्ये काढण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

यंदाच्यानववर्षाचा जल्लोष पार्ट्यांवर ओमायक्रॉनचे संकट घोंगावत आहे. मागील काही दिवसात ओमायक्रॉनची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. उपराजधानी नागपुरात ओमायक्रॉनचे सहा रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नववर्षाच्या स्वागत पार्ट्यांमध्ये लोक एकत्र आल्याने संसर्ग आणि पसार आणखी झपाट्याने होण्याची भीती आहे. त्यामुळे हा जल्लोष कोणाच्या जीवावर बेतू नये, यासाठी पोलीस ठिकठिकाणी तैनात असणार आहे. राज्य सरकारने नववर्षाच्या जल्लोष पार्ट्यांवर बंदी घातली आहे.

नागपूरचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार पत्रकारांशी बोलताना

हॉटेल्स केवळ जेवणासाठी खुले असतील -

हॉटेल्स रेस्टॉरंट 12 वाजेपर्यंत 50% क्षमतेने चालू राहतील. पण यामध्ये पार्टी साजरी (New Year Celebration 2022 )करता येणार नाही, किंवा डांसचे आयोजन करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. यासोबतच रात्री नऊनंतर जमावबंदी असल्याने पाच पेक्षा जास्त लोकांनी बाहेर फिरू नये. शहरातील उद्यानात किंवा बगीच्यांमध्ये एकत्र येऊन नववर्ष साजरा करण्यात येतो. नागपूरचा फुटाळा तलाव, अंबाझरी, बाळ उद्यान किंवा अन्य अशा ठिकाणी कोणी आढळून आल्यास गंभीर स्वरूपाची कारवाई होणार असल्याचे पोलीस विभागाकडून सांगण्यात आले आहे.

नाकेबंदी करत ड्रंक अँड ड्राईव्हवर लक्ष -

शहरातील दुकाने रात्री 9 पर्यंत बंद करण्याच्या सूचनाही देण्यात आलेल्या आहेत. सर्वत्र रस्त्यावर प्रमुख चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शहराच्या प्रवेशद्वारावर नाकेबंदी करण्यात येणार आहे. यासोबतच अपघात होण्याची शक्यता लक्षात घेता शहरातील फ्लाय ओव्हर रात्री वाहतुकीसाठी बंद असणार आहे. नाकेबंदीच्या माध्यमातून ड्रंक अँड ड्राइव्हची सुद्धा तपासणी केली जाणार आहेत. त्यामुळे कोणीही मद्यपान करून वाहने चालवू नये, यासाठी सुद्धा पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. सार्वजनिक ठिकाणांबरोबरच हाऊसिंग सोसायटीत किंवा टेरेसवरही एकत्र येऊन पार्टी करता येणार नाही. यासोबतच लोकांनी हाऊसिंग सोसायटीमध्ये सुद्धा एकत्र येऊन पार्टी करण्यावर बंदी घातली आहे. यासोबतच टेरेसवर होणाऱ्या पार्ट्या, डीजे असे काही प्रकार आढळून आल्यास त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्याचा इशारा पोलीस प्रशासनांकडून देण्यात आलेला आहे. त्यामुळे नागरिकांनी नववर्ष साजरा करत असताना स्वतःच्या घरात आणि कुटुंबियांसोबतच साजरा करावा असा संदेश देण्यात आला आहे.

पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात -

नागपूर शहरांमध्ये पोलीस बंदोबस्तामध्ये जवळपास अडीच हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकारी कार्यरत असणार असणार (New year police guidlines) आहेत. तसेच 75 ठिकाणी नाकेबंदी केली जाणार आहे. तर जवळपास शहरातील शंभर ठिकाणांवर पोलिसांचे लक्ष असणार आहे. जवळपास 100 वाहनांच्या माध्यमातून शहरात पेट्रोलिंग केली जाणार आहे. 150 बीट मार्शल आणि गुन्हे शाखेचे पथक बंदोबस्तात शहरभर फिरणार आहे. असा मोठा फौजफाटा नववर्षाच्या जल्लोषात होणाऱ्या पार्ट्यांवर नजर ठेवण्यासाठी शहरात तैनात असणार आहे.

Last Updated : Dec 31, 2021, 3:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details