नागपूर -नागपूर शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खोब्रागडे चौकात एका कुख्यात गुंडाची हत्या झाली आहे. फ्रॅंक भूषण अनथोनी उर्फ फ्रॅंक अण्णा (४०) असे मृताचे नाव आहे. दारूच्या नशेत झालेल्या वादातून पाच गुंडांनी संगनमत करून फ्रॅंक भूषण अनथोनी याची शस्त्रांनी भोसकून हत्या केली.
वैभव जाधव - पोलीस निरीक्षक, जरीपटका फ्रॅंक अण्णाच्या हत्येप्रकरणी जरीपटका पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे. त्यामध्ये विकी उर्फ सतीश नंदलाल तायवाडे,क्रिस्तोफर संजय डॅनियल, सोबीएल संजय डॅनियल, सॅम पीटर आणि आकाश रवी वाघाडे यांचा समावेश आहे.
हेही वाचा -विलेपार्ले येथे एनसीबीकडून कोट्यवधींचे ड्रग्ज जप्त, संशयित आरोपी फरार
पाच आरोपींना अटक -
फ्रॅंक अण्णा हा अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कौशल्या नगर भागात राहतो. काल रात्री तो जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या सासुरवाडीत गेला होता. त्यावेळी खोब्रागडे चौकात पाच दारुड्यांमध्ये वाद सुरू होता. फ्रॅंक अण्णा तिथे उभा राहून वाद बघत असताना भांडण करत असलेल्या एकाने त्याला काय बघतोय बे असं म्हंटल्यानंतर फ्रॅंक अण्णा चिडला. त्यानंतर फ्रॅंक अण्णा आणि त्या पाच आरोपींमध्ये वाद सुरू झाला असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या शस्त्राने फ्रॅंक अण्णाला जखमी केली. यावर समाधान न झाल्याने आरोपींनी त्याची दगडाने ठेचून हत्या केली. यावेळी पाचही आरोपी दारूच्या नशेत होते. घटनेची माहिती समजताच जरीपटका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत फ्रॅंक अण्णाचा मृत्यू झाला होता. पोलिसांनी पाचही आरोपींना अटक केली आहे.
मृत अण्णावर अनेक गुन्हे -
फ्रॅंक भूषण अनथोनी उर्फ फ्रॅंक अण्णा विरुद्ध गिट्टीखदान अजनीसह अन्य काही पोलीस ठाण्यात अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. हत्येच्या एका प्रकरणात देखील त्याचा सहभाग होता. तो अनेक वर्षांपासून गुन्हेगारी क्षेत्रात सक्रिय होता.
हेही वाचा -विकृतीचा कळस : सावत्र बापानेच अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार; जन्मदात्या आईच्या मदतीने केले घृणास्पद कृत्य