नागपूर - नागपूरच्या प्रशासकीय भवनातील महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमीच्या (मनरेगा) राज्य आयुक्तालयाच्या कार्यालयात आग लागल्याची घटना घडली आहे. ही आग रविवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास लागली. या आगीमध्ये ऑफीस पूर्णपणे जळून खाक झाले आहे. दरम्यान अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले आहे. मात्र या आगीमध्ये कार्यालयातील सर्व दस्तावेज जळून खाक झाले आहेत.
प्रशासकीय भवनात आग लागल्याची माहिती मिळताच, अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. मात्र तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. अग्निशमन दलाच्या प्रयत्नामुळे ही आग 8 मजली प्रशासकीय इमारतीच्या इतर मजल्यांवर पसरली नाही. आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने मोठे नुकसान टळले आहे.