महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Fraud With Doctor : नागपूरच्या डॉक्टरला मध्यप्रदेशातील भामट्यांचा गंडा, स्वस्तात कार देण्याच्या बहाण्याने 11 लाखांची फसवणूक - नागपूर पोलीस कारवाई

डॉक्टर सेलूकर यांनी नवीन कार घेणार असल्याचे आयुष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल यांना सांगितले. तेव्हा अग्रवाल यांनी महाराष्ट्र ऐवजी मध्यप्रदेशमधून कार घेतल्यास आरटीओ नोंदणी कर किमान दोन ते तीन लाख रुपयांनी कमी लागेल, असे सांगितले. तेव्हा डॉक्टर धनंजय सेलूकर यांनी कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले. मात्र, आरोपींनी केवळ 50 हजार रुपये शोरुममध्ये भरुन उर्वरित रक्कम लंपास केली.

Fraud With Doctor
अजनी पोलीस ठाणे

By

Published : May 13, 2022, 6:41 PM IST

नागपूर - लक्झरी कार स्वस्तात मिळवून देण्याच्या आमिषाने डॉक्टरला तब्बल 11 लाख 12 हजार रुपयांचा गंडा घातल्याने खळबळ उडाली. ही घटना शहरातील अजनी परिसरात घडली. धनंजय सेलूकर असे फसवणूक झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. तर आयुष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल असे फसवणूक करणाऱ्या भामट्यांची नावे आहेत. हे दोघेही मध्यप्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महाराष्ट्राच्या तुलनेत मध्यप्रदेशात कर कमी असल्याने किमान दोन लाखाचा फायदा होईल, असे आमिष या भामट्यांनी दिले होते.

मध्यप्रदेशात आरटीओ नोंदणी कर कमी असल्याचे आमिष -या प्रकरणातील तक्रारदार डॉ. धनंजय सेलूकर हे स्पेशालिटी रुग्णालयात युरोलॉजी विभाग प्रमुख आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांची आयुष अग्रवाल आणि पंकज अग्रवाल यांच्या सोबत भेट झाली होती. यावेळी डॉक्टर सेलूकर यांनी नवीन कार घेणार असल्याचे त्यांना सांगितले तेव्हा अग्रवाल यांनी महाराष्ट्र ऐवजी मध्यप्रदेशमधून कार घेतल्यास आरटीओ नोंदणी कर किमान दोन ते तीन लाख रुपयांनी कमी लागेल, असे सांगितले. तेव्हा डॉक्टर धनंजय सेलूकर यांनी मध्यप्रदेशमधून कार विकत घेण्याची तयारी दर्शवली. त्यांनी कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये आरोपींच्या बँक खात्यात वळते केले. मात्र, आरोपींनी केवळ 50 हजार रुपयेचे कार शोरूममध्ये भरून उर्वरित रक्कम लंपास केल्याचे उघड झाले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच धनंजय यांनी थेट अजनी पोलीस ठाणे गाठले. त्यांनी झालेला प्रकार कथन करुन फसवणूक करणाऱ्या आरोपीं विरुद्ध तक्रार दाखल केली आहे.

डॉक्टरला होती कार मिळण्याची प्रतीक्षा -कार बुक करण्यासाठी 11 लाख 12 हजार रुपये बुकिंग अमाउंट जमा केल्यानंतर लवकर कारची डिलिव्हरी मिळेल, अशी अपेक्षा डॉक्टरला होती. मात्र, कार मिळण्यास उशीर होत असल्याने त्यांनी कार शोरूममध्ये चौकशी केली. त्यावेळी केवळ 50 हजार रुपये बुकिंग अमाउंट जमा झाल्याचे त्यांना समजले. त्यानंतर त्यांनी मित्रांकडे चौकशी केली तेव्हा, त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले.

ABOUT THE AUTHOR

...view details